विदर्भ

Maharashtra Assembly Election: महायुती, आघाडीला रोखण्यासाठी परिवर्तन आघाडी मैदानात! अशी असेल रणनीती

योगेश फरपट

Akola News: जिल्ह्यातच नव्हेतर राज्यात महायुती व महाविकास आघाडीला रोखण्यासाठी परिवर्तन आघाडी मैदानात उतरली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुती व महाविकास आघाडी विरोधात शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पार्टी सोबतच जिल्हा व गाव पातळीवरील शेतकरी संघटनांना एकत्र घेऊन परिवर्तन आघाडी स्थापन झाली आहे.

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सर्व मुक्तीवादी संघटनांना एकत्रित करून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित बहाळे यांनी अकोल्यात केली. ते स्वतःही अकोट विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचेही त्यांनी जाहिर केले.

राज्य विधानसभेचा कार्यकाळ पूर्ण होत आलेला आहे. विधानसभा पुनर्गठित करण्यासाठी निर्वाचन आयोग लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर करेल. निवडणूकीत भाग घेऊ इच्छिणाऱ्या प्रस्थापित राजकीय समुहांनी संगठित केलेल्या युत्या- आघाड्याच्या हालचाली वाढल्या आहेत. युत्या-आघाड्यांनी आपापल्या सत्ता काळात अवलंबलेल्या धोरणाने उत्पादक श्रम, शेती, उद्योग, सेवा- उद्योग, अनुसंधान या सर्व क्षेत्रातील उद्योजकता क्षिण पावत आहे. संपत्ती निर्माण करणार्या सर्व सामाजिक घटकां विरूद्ध विविध प्रकारे निर्बंध किंवा जाचक कर प्रणाली विकसित केली आहे.

महसुल निर्मित ची विविध साधनं निर्माण करून एकुणच अर्थव्यस्थेला घातक अशाप्रकारे खर्च करणे याचा सपाटाच लावला आहे. राजकारणाचे स्वरूप सत्ताकारणात रुपांतरीत करून स्थापित करण्यात आले आहे. धोरणाने उद्भवलेल्या समस्यांचे समाधान अर्थसंकल्पीय तरतूदीने करण्याच्या उपद्यापामुळे अर्थार्जनाची साधनं विकसित होण्यामध्ये अडथडे निर्माण होत आहे. अल्पार्जन, बेरोजगारी, आरक्षणविषयक जातीय अस्मिता, नोकरशाहीचा हैदोस अश्या एक ना अनेक वित्तीय, आर्थिक, सामाजिक अवस्थेला समाज समोर जात आहे. या सर्व परिस्थितीतून जनलेला दिलासा देण्यासाठी परिवर्तन आघाडी काम करणार आहे.

एकत्र येण्याचे आवाहन

जिल्हयातीलच नव्हेतर राज्यातील मुक्त चळवळीत सहभागी असलेल्या सर्व समविचारी पक्ष, संघटनांनीही आमच्यासोबत यावे असे आवाहन ललित बहाळे यांनी यानिमित्ताने केले आहे. परिवर्तन आघाडी धोरणात्मक परिवर्तनाचा पर्याय आहे.

सत्ता परिवर्तन म्हणून नाही. राज्यात महायुती-महाआघाडीच्या धोरणाने ग्रस्त असलेल्या सर्व पक्ष-संघटनांनी एकत्रित येण्याची गरज असल्याचे शेतकरी संघटनेने म्हटले आहे. या पत्रपरिषदेला विलास ताथोड, अविनाश नाकट, डॉ निलेश पाटील, सुरेश जोगळे, सतीश देशमुख, धनंजय मिश्रा, बळीराम पांडव, जसराज बहाळे, राजकुमार भटड, सतीश उंबरकर, डॉ मुकेश टापरे, शंकर कंवर आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Animal Fat in Temple: जगनमोहन रेड्डींनी तिरुपती मंदिरातील लाडूमध्ये वापरली जनावरांची चरबी? CM चंद्राबाबूंच्या आरोपाने खळबळ

Mumbai: विसर्जन मिरवणुकीत चोरांचा सुळसुळाट; तब्बल इतके मोबाईल केले लंपास, लालबागच्या राजाच्या मिरवणुकीत सर्वाधिक

One Nation One Election: ...तर पुढील विधानसभा ४.५ वर्षांची; यंदाच्या निवडणूक वेळापत्रकात बदलाची शक्यता नाही

IND vs BAN 1st Test Live Streaming: भारत-बांगलादेश पहिली कसोटी 'फ्री' मध्ये पाहा; किती वाजता, कोणत्या चॅनेलवर अन् ॲपवर दिसणार?

Cutlet Recipe: सकाळी नाश्त्यात मुग, मटकीपासून बनवा बहुगुणी कटलेट, दिवसभर राहाल उत्साही

SCROLL FOR NEXT