विदर्भ

Mahayuti: महायुतीच्या समन्वयकांच्या यादीने खळबळ, वाचा कोणा कोणाची आहेत नावं?

Maharashtra Politcal News : शिवसेनेकडून जगदीश गुप्ता तर राष्ट्रवादीचे प्रशांत डवरे समन्वयक राहणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीने आज त्यांच्या विधानसभानिहाय समन्वयकांची यादी जाहीर केली. त्यात बडनेरा मतदारसंघाच्या भाजप समन्वयकपदी आमदार रवी राणा यांची नियुक्ती करण्यात आल्याने राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे.

महायुतीच्या भाजप, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) विधानसभानिहाय समन्वयकांची एकत्रित यादी बुधवारी (ता. आठ) जाहीर करण्यात आली. बडनेरा मतदारसंघाच्या भाजपच्या समन्वयकपदी आमदार रवी राणा, शिवसेनेचे रोशन मातकर व राष्ट्रवादीचे अविनाश मार्डीकर यांना स्थान देण्यात आले आहे. अमरावती मतदारसंघात भाजपकडून जयंत डेहनकर, शिवसेनेकडून जगदीश गुप्ता तर राष्ट्रवादीचे प्रशांत डवरे समन्वयक राहणार आहेत.

.

आमदार रवी राणा यांच्यावर ही जबाबदारी टाकण्यात आल्याने भाजपचे पदाधिकारी तसेच कार्यकर्तेसुद्धा बुचकळ्यात पडले आहेत. रवी राणा हे भाजपचे सदस्यसुद्धा नाहीत, अशा स्थितीत त्यांच्यावर ही जबाबदारी कशी सोपविण्यात आली, ते भाजपचे उमेदवार राहतील काय, असे प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाले आहेत. ऐन निवडणुकीच्या काळात या यादीमुळे सारेच संभ्रमात असून कोणताही नेता अधिकृत प्रतिक्रिया देण्यासाठी तयार नाही.

दुसरीकडे जगदीश गुप्ता हे भाजपचे ज्येष्ठ नेते असताना ते शिवसेनेकडून समन्वयक कसे, असा सवाल करण्यात येत आहे. दरम्यान, धामणगाव रेल्वे मतदारसंघात भाजपच्या समन्वयकपदाची जबाबदारी रावसाहेब रोठे, शिवसेनेचे अंकुश खाकरे, तर राष्ट्रवादीची जबाबदारी दुर्गाबक्षसिंह ठाकूर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. तिवस्यात भाजपची जबाबदारी नितीन गुडधे, शिवसेनेची अजय पांडे, तर राष्ट्रवादीची जबाबदारी अजय अग्रवाल यांच्यावर आहे. दर्यापूर विधानसभेची भाजपची जबाबदारी माणिकराव मानकर यांच्यावर तर शिवसेनेची गोपाल अरबट व राष्ट्रवादीची प्रशांत ठाकरे यांच्यावर आहे.

मेळघाटात भाजपचे रितेश नवले, शिवसेनेचे मंगल धुर्वे, तर राष्ट्रवादीचे रोहीत पाल समन्वयक म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. अचलपूर विधानसभेच्या समन्वयकपदाची जबाबदारी भाजपचे प्रमोद कोरडे, शिवसेनेचे भूषण नागे व शिवसेनेचे प्रवीण भुजाडे यांच्यावर आहे. मोर्शी विधानसभेच्या समन्वयकाची जबाबदारी भाजपचे अॅड. शशिकांत उमेकर, शिवसेनेचे निशांत हरणे व राष्ट्रवादीचे नीलेश मगरदे यांच्यावर असल्याचे या यादीत नमूद करण्यात आले आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT