Orange sakal
विदर्भ

Orange Project : अर्थसंकल्पात घोर निराशा; विदर्भात एकाही संत्राप्रकल्पाला निधी नाही

सकाळ वृत्तसेवा

मोर्शी - राज्य सरकारने २०२४ चा अर्थसंकल्प नुकताच सादर केला. मात्र, त्यामध्येही अत्याधुनिक संत्राप्रकल्पासाठी आर्थिक तरतूद होऊ शकली नाही. त्यामुळे विदर्भातील संत्राउत्पादक शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.

विदर्भात एवढ्या वर्षाच्या काळात आजपर्यंत एकही संत्राप्रक्रिया प्रकल्प राज्य सरकारला उभारता आला नाही, ही शोकांतिका आहे. विदर्भातील संत्राउत्पादक शेतकऱ्यांना फक्त तारीख पे तारीख देऊन विविध अर्थसंकल्पात संत्राप्रक्रिया प्रकल्पाची घोषणा करून विदर्भातील संत्राउत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक केल्या गेली आहे.

आशिया खंडातील सर्वांत जास्त पिकविला जाणाऱ्या मोर्शी-वरुड तालुक्यातील नागपुरी संत्र्याने वेगळी ओळख निर्माण केली आहे. मोर्शी-वरुड तालुक्यात ४७ हजार हेक्टरमध्ये संत्र्याचे उत्पादन घेतले जाते.

परंतु तालुक्यात कुठेच संत्र्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प नाही. कोल्डस्टोरेज व वेअर हाउस सुविधा नाही तसेच संत्रा व मोसंबीवर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पाची वाणवा असल्याने शासनाच्या उदासीन धोरणामुळे शेतकऱ्यांना त्यांचा संत्रा कवडीमोल भावात विकावा लागत असल्याचा आरोप आहे.

मागील काही वर्षांपूर्वी वरुड तालुक्यात संत्रापरिषदेच्या उद्घाटनाला आलेले राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरुड येथे ऑरेंज डिहायड्रेशन प्रकल्प उभारणीची घोषणा केली होती. नंतर महाआघाडी सरकारनेदेखील वरुड-मोर्शीसाठी संत्राप्रक्रिया केंद्रे उभारण्याची घोषणा केली. मात्र ती पूर्ण होऊ शकली नाही.

शासनाने घोषित केलेल्या ऑरेंज डिहायड्रेशन प्रकल्प, अत्याधुनिक संत्रा प्रकल्प, हिवरखेड (ठाणाठुनी) येथील संत्रा उन्नती प्रकल्पाकरिता निधी उपलब्ध करून संत्राप्रक्रिया प्रकल्प पूर्णत्वास न्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रूपेश वाळके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST: 'जीएसटी'वरील टिप्पणी हॉटेल मालकास भोवली; भाजपने अर्थमंत्र्यांची मागायला लावली माफी, घटनेचा VIDEO व्हायरल

Onion Export Ban : कांदा निर्यातबंदीचा महायुतीला धसका! विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर निर्यातबंदी उठविण्याचा निर्णय

Drunk And Drive Accident : भीषण! 10 वर्षानंतर झालेल्या बाळाचे बारसे आटोपून निघालं होतं कुटुंब; आई-बाळासह चौघांचा मृत्यू

Latest Marathi News Updates : रामगड विधानसभेतील काँग्रेसचे आमदार जुबेर खान यांचे निधन

Hair Fall: अनेक प्रयत्न करूनही केस गळती थांबत नसेल तर डॉक्टरांकडून जाणून घ्या कारणे

SCROLL FOR NEXT