Man loose Sarpanch post as late by 3 minutes in Chandrapur  
विदर्भ

अवघ्या तीन मिनिटांनी झाला उशीर अन् होत्याचं झालं नव्हतं; हातून गेली गावाची सत्ता 

संदीप रायपूरे

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : बहूमताचा आकडा जुळवत पॅनलचा लिडर सदस्यांना घेउन सैर करण्यासाठी गेेले.आपलीच सत्ता येणार याचा आंनद त्यांना गगनात मावेनासा झाला. काल सरपंच, उपसरपंचपदाची निवडणुक होती. याकरिता ते चारही सदस्य ग्रामपंचायत मध्ये दाखल झाले.पण तिन मिनीट उशीर झाला. अन होत्याच नव्हत झाल. या ३ मिनीटासाठी त्यांच्या हातून सत्ता गेली. तर तीन सदस्य असलेला तरूण उमरे सरपंच झाला. गोंडपिपरी तालुक्यातील तारडा ग्रामपंचायतीत हा रंगतदार प्रकार घडला.

ग्रामपंचायतीच्या निवडणुका म्हटल कि लईच भारी.अगदी शेवटपर्यत काय होईल हे सांगता येत नाही. तालुक्यातील तारडा ग्रामपंचायतीची निवडणुक पार पडली. प्रशासनाने अनु.जाती करिता सरपंचपदाचे आरक्षण जाहीर केले.गावातील दोघे या गटातून निवडून आल्याने रस्सीखेच सुरू झाली. यापैकी एका गटाने चार उमेदवार गोळा केले. कुणाला दुसऱ्या गटात जाण्याची संधी मिळू नये यासाठी संपुर्ण चमुला घेउन सैर करण्यासाठी गेले. काल तारडा येथील सरपंचपदाची निवडणुक प्रक्रिया होणार होती. याकरिता ही मंडळी ग्रामपंचायत मध्ये दाखल झाली पण त्यांना तिथे पोहचण्यास ३ मिनीट उशीर झाला. त्यामुळे त्यांना सरपंच पदाकरिता अर्ज दाखल करता आला नाही. 

इकडे दुसऱ्या गटातील तरूण उमरे याने सरंपचपदासाठी अर्ज दाखल केला होता.तिन मिनीट उशीर झाल्यामुळे चौघा सदस्यांना प्रवेश मिळाला नाही. यामुळ कोरम अभावी काल होणारी सभा रद्द झाली.अन संरपंचाची निवड होऊ शकली नाही. आज प्रशासनाने या गावात सभा बोलाविली. तहसिलदार के.डी.मेश्राम हे तारडा येथे उपस्थित होते. अर्ज भरण्याचा दिनांक न्याची तारीख गेल्यामुळे दुसऱ्या गटाला अर्ज भरण्याची संधी मिळाली नाही.अनं तिन सदस्य असूनही पहिल्या दिवशी अर्ज दाखल केलेला तरूण उमरे याची सरपंचपदी निवड झाली.अवघ्या तिन मिनीटाचा फरक पडल्याने तारडयातील राजकारणात झालेल्या सत्तांबदलाची खमंग चर्चा तालुक्यात रंगत आहे.

तारडयातील शिवसैनिक सरपंचपदावर विराजमान झाल्याचे घोषित होताच शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केला. यावेळी सुनील संकुलवार,संजय माडूरवार,संजय मारगोनवार,नितीन धानोरकर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. निर्धारित वेळेत उपस्थित न झाल्याने सभा तहकुब केली.काल उमरेनी अर्ज दाखल केला होता.त्यामुळे आज सभा घेत बिनविरोधपणे त्यांची सरपंच पदावर निवड करण्यात आली.
के.डी.मेश्राम, 
तहसिलदार तथा निवडणुक निर्णय अधिकारी,गोंडपिपरी

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपाचे उमेदवार कीर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया यांना ५१७८ मतांची आघाडी घेतली

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT