Married to a third while having two wives 
विदर्भ

अभियंत्याची कमाल... दोन बायका असताना तिसरीसोबत चढला बोहल्यावर 

संतोष ताकपिरे

अमरावती  : आधीपासून दोन पत्नी, त्यांची अपत्ये अस्तित्वात असतानाही स्वत:ला अभियंता असल्याचे सांगून तो तिस-यांदा बोहल्यावर चढला. लग्नानंतर काही महिन्यांतच त्याच्या पहिल्या आणि दुस-या पत्नीचा तिस-या पत्नीला फोन येताच या महाशयाचा प्रताप पुढे आला. आधीच विवाहित असताना तिस-यांदा विवाह करून त्याने अमरावतीच्या युवतीची फसवणूक केली. बाबासाहेब सीताराम छडीदार (वय ३९, बोराखेडी, ता. देऊळगाव) व विकास रामभाऊ मुळे (वय ३८, रा. भिवगाव. ता. देऊळगाव), अशी फसवणूक करणा-यांची नावे आहेत. 

अमरावतीच्या युवतीसोबत तिसरे लग्न करणा-याचे नाव बाबासाहेब छडीदार असल्याचे फ्रेजरपुराचे पोलिस निरीक्षक पुंडलिक मेश्राम यांनी सांगितले. फ्रेजरपुराहद्दीत राहणा-या (वय ३४) युवतीने विवाहासाठी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर स्वत:ची माहिती प्रसिद्ध केली. एका मैत्रिणीने संपर्क साधून तिचे लग्न विकास मुळे सोबत जुळल्याचे सांगितले. विकासचा एक मावसभाऊ बाबासाहेब छडीदार असून, त्याच्यासाठी वधूसंशोधन सुरू असल्याचे सांगितले.

बाबासाहेब मुलीला बघण्याकरिता एप्रिल २०१९ मध्ये अमरावतीत विकाससोबत आला. त्याने मुलीच्या कुटुंबीयांना दोघेही व्यवसायाने अभियंता असून,  लॅण्ड डेव्हलपमेंटची कंपनी व मालकीचे औरंगाबाद येथे घर असल्याचे सांगितले. दोघांनी स्वत:ला अनाथ असून जवळचे नातेवाईक नसल्याचे मुलीकडील लोकांना सांगितले. पसंतीनंतर बाबासाहेब छडीदारचा साखरपुडा पार पडला. १० मे २०१९ रोजी त्यांचे लग्न झाले. त्यानंतर तिच्या मैत्रिणीचेही लग्न विकास सोबत झाले. विकास व बाबासाहेब आपापल्या पत्नींसह औरंगाबाद येथे एकाच ठिकाणी राहू लागले. 

मैत्रिणीने सांगताच धक्का बसला

मैत्रिणीने अमरावतीच्या युवतीला तिच्या पतीचे आधीच दोन लग्न झाले असून, दोन्ही पत्नीपासून तीन अपत्य असल्याची माहिती दिली. त्यामुळे युवतीला  धक्काच बसला. त्यानंतर बाबासाहेब छडीदार याच्या पहिल्या व दुस-या पत्नीशी बोलणे झाल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे तिसरीच्या लक्षात आले. 

लग्नात गिफ्ट नव्हे रोकड मागितली

अमरावतीच्या युवतीसोबत लग्न जुळल्यानंतर कथित अभियंता बाबासाहेब याने आपल्याला लग्नात कोणत्याही भेटवस्तू न देता रोख रक्कम द्यावी, अशी मागणी केली. वधूपित्याकडून ४२ हजार रुपये, एक अंगठी आणि गिफ्ट स्वरूपात मिळालेले ८० हजार रुपये, असा एकूण १ लाख २७ हजारांचा ऐवज त्याने हस्तगत केला.

आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल
पीडितेच्या तक्रारीची तातडीने दखल घेऊन तिसरे लग्न करणा-या बाबासाहेब छडीदार व त्याचा मदत करणारा विकास विरुद्ध फसवणूक, विश्वासघात, जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले.
-पुंडलिक मेश्राम,
पोलिस  निरीक्षक फ्रेजरपुरा ठाणे. अमरावती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लोकसभेचा उत्साह सातव्या आसमानावर; विधानसभेत भ्रमाचा भोपला फुटला, काँग्रेसच्या आत्मविश्वासानं MVAचा खेळ केला?

Abhimanyu Pawar won Aausa Assembly Election : औसा मध्ये फडकला भाजपाचा झेंडा! अभिमन्यू पवारांचा भव्य विजय

Kopri Pachpakhadi Assembly Election 2024 Result: येऊन येऊन येणार कोण! कोपरी पाचपाखाडीत एकनाथ शिंदेंचा एकहाती विजय; केदार दिघेंचा लाजिरवाणा पराभव

Karveer Assembly Election 2024 Results : करवीर मतदारसंघात पुन्हा 'चंद्रदीप'; अतिशय चुरशीच्या लढतीत राहुल पाटलांचा अवघ्या काही मतांनी पराभव

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: शरदचंद्र पवार पक्षाचे विजयी उमेदवार अभिजीत पाटील यांनी जीपवर चढून दंड थोपटत विजय साजरा केला

SCROLL FOR NEXT