Amravati Health Department  sakal
विदर्भ

Amravati Health Department : आणखी एका मातेचा मृत्यू, तीन रुग्णालयांनी रेफर करून, चौथ्या रुग्णालयात मृत्यू

Amravati Health Department Health Department : मेळघाटातील कुपोषण, मातामृत्यू व बालमृत्यू रोखण्यासाठी राज्य व केंद्र सरकारमार्फत कोट्यावधीच्या योजना राबविल्या जातात,त्यात आणखी एका मातेच्या मृत्यूने भर पडली आहे.

सकाळ वृत्तसेवा

चिखलदरा : मेळघाटातील कुपोषण, मातामृत्यू व बालमृत्यू रोखण्यासाठी राज्य व केंद्र सरकारमार्फत कोट्यावधीच्या योजना राबविल्या जातात. मात्र तरीही मेळघाटातील बालमृत्यू व मातामृत्यूचे सत्र थांबत नसल्याची गंभीर स्थिती आहे. त्यात आणखी एका मातेच्या मृत्यूने भर पडली आहे. तब्बल तीन रुग्णालयांनी या महिलेला रेफर केले व चौथ्या रुग्णालयात तिचा मृत्यू झाला.

चिखलदरा तालुक्यातील भडोरा या गावातील एका मातेचा मृत्यू झाला असून या मातामृत्यूने एकाच खळबळ उडाली आहे. भंडोरा गावातील शीला अरविंद भूसुम (वय २६) ही महिला साडेआठ महिन्याची गरोदर होती. १९ सप्टेंबर रोजी या महिलेची तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर या महिलेला चुरणी ग्रामीण रुग्णालय येथे भरती करण्यात आले.

परंतु तिची प्रकृती खालावत असल्याने अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. या महिलेच्या शरीरात रक्त कमी असल्यामुळे तेथे रक्त देण्यात आले. परंतु त्यानंतर या महिलेला अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात (डफरीन) रेफर करण्यात आले. प्रस्तुतीला वेळ असल्याने डफरीन येथून तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. परंतु तिची प्रकृती अजूनच खालावल्याने तिला आयसीयू मध्ये भरती करण्यात आले. उपचारादरम्यान शनिवारी (ता.२१) दुपारी बारा वाजता या महिलेचा मृत्यू झाला.

रुग्णालय की रेफर सेंटर

मेळघाटच्या शासकीय रुग्णालयांना अत्याधुनिक सोयी पुरविण्यात येत असल्याचे वेळोवेळी सांगण्यात येते. प्रत्यक्षात ही रुग्णालये रेफर सेंटर झाली आहेत की काय? अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे. वारंवार अशा घटना घडत असतानाही आरोग्य विभागातील वरिष्ठांपासून लोकप्रतिनिधी सुद्धा संवेदनशील नसल्याचा आरोप होत आहे.

या महिलेच्या सर्व तपासण्या करण्यात आल्या होत्या. ही महिला सिकलसेल पॉझिटिव्ह असल्यामुळे या अगोदरही त्या महिलेला रक्त दिले होते. तसेच हायरिक्स असल्यामुळे वेळोवेळी सर्व तपासण्या होत होत्या. त्यामुळेच आम्ही या महिलेला १९ तारखेला भरती करून घेतले होते. पुढील उपचारासाठी अमरावती येथे पाठविण्यात आले. उपचारदरम्यान या महिलेचा मृत्यू झाला.

-डॉ. राकेश अलोकार,

वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, काटकुंभ.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swara Bhaskar: अभिनेत्री स्वरा भास्करचा पती शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभेच्या मैदानात, मुंडेंचा विरोधकही ठरला

अर्रर्र! अर्जुन कपूरचा चित्रपट ठरला सगळ्यांत फ्लॉप; OTT वरही मिळेना संधी

Kothrud Assembly Election : कोथरूडमध्ये चंद्रकांत विरूद्ध चंद्रकांत! पाटलांना मोकाटेंचे आव्हान

Ishan Kishan: धडाकेबाज फलंदाजाचे वडीलही राजकारणात; लवकरच करणार मुख्यमंत्र्यांच्या पक्षात प्रवेश

Diwali 2024 : रविवारची सुट्टी सार्थकी लावा, या सोप्या स्टेप्सनी घरीच दिवाळीचा आकाश कंदिल बनवा

SCROLL FOR NEXT