Ayurvedic hospital sakal
विदर्भ

Ayurvedic Hospital : मेळघाटातील आयुर्वेदिक दवाखाने झाली पोरकी; रिक्त पदे भरण्याची मागणी

मेळघाटात ११ प्राथमिक आरोग्य केंद्रासह २७ उपकेंद्र आहेत. सोबतीला जिल्हा परिषदेचे चार आयुर्वेदिक आरोग्य केंद्रासह ग्रामीण रुग्णालय सुद्धा आहेत.

राज इंगळे

अचलपूर - ग्रामीण भागातील सामान्य गोरगरीब जनतेचे आरोग्य सुदृढ राहावे, कोणताही नागरिक आरोग्य सेवेपासून वंचित राहणार नाही, समस्त जनतेला आरोग्य सेवा सहज उपलब्ध व्हावी, यासाठी शासन स्तरावरून विविध योजना राबवीत येत आहेत. मात्र दुसरीकडे आरोग्यसेवा पुरविणाऱ्या यंत्रणा मनुष्यबळाअभावी कुचकामी ठरत आहेत. मेळघाटातील जिल्हा परिषद आयुर्वेदिक दवाखान्यातील पदे रिक्त आहेत.त्यामुळे आयुर्वेदिक दवाखाने डॉक्टरविना पोरके झाले आहेत.

मेळघाटातील जनतेचे आरोग्य सुदृढ राहावे तथा कोणताही नागरिक आरोग्य सेवेपासून वंचित राहणार नाही आणि समस्त जनतेला आरोग्यसेवा सहज उपलब्ध व्हावी, यासाठी शासन स्तरावरून विविध योजना राबवीत येतात. मात्र मेळघाटात या योजनेचा पाहिजे तेवढा फायदा आरोग्य विभागाला होताना दिसत नाही. याला काही अंशी आरोग्य विभागात मनुष्यबळ कारणीभूत ठरत आहे.

मेळघाटात ११ प्राथमिक आरोग्य केंद्रासह २७ उपकेंद्र आहेत. सोबतीला जिल्हा परिषदेचे चार आयुर्वेदिक आरोग्य केंद्रासह ग्रामीण रुग्णालय सुद्धा आहेत. यापैकी आयुर्वेदिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पदे रिक्त आहे. त्यामुळे मेळघाटातील आयुर्वेदिक आरोग्य केंद्र डॉक्टरविना पोरके झाले आहे.

परिणामी ग्रामस्थांना आयुर्वेदिक उपचारापासून वंचित राहावे लागत आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन तत्काळ आयुर्वेदिक केंद्रातील रिक्त पदे भरण्याची मागणी करण्यात येत आहे.

मेळघाटात डॉक्टरांची पदे रिक्त

मेळघाटातील आयुर्वेदिक दवाखान्यातील पदासह अन्य आरोग्य केंद्रात सुद्धा डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे अन्य डॉक्टरांवर ताण पडत आहे. त्यामुळे रिक्त असलेली पदे तत्काळ भरण्याची गरज मेळघाटच्या दृष्टीने निर्माण झाली आहे.

आयुर्वेदिक दवाखान्यातील रिक्त पदांची माहिती आरोग्य विभागाच्या संचालक विभागाला देण्यात आली आहे. लवकरच रिक्त पदे भरणार असल्याचे सांगण्यात आले. सध्या मेळघाटातील प्रत्येक उपकेंद्राच्या ठिकाणी सामुदायिक आरोग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना उपचारात कोणतीही अडचण जात नाही.

- डॉ. सुरेश आसोले, जिल्हा आरोग्य अधिकारी, अमरावती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT