milk bank provide mother milk to needy child in amravati 
विदर्भ

आता आईच्या दुधावाचून जाणार नाही बालकांचा जीव; गरजूंना मिल्क बँकेचा आधार, आतापर्यंत हजारोंना जीवदान

कृष्णा लोखंडे

अमरावती : आईच्या दुधाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. जन्मतःच रोगप्रतीकारशक्ती प्रदान करणाऱ्या आईच्या दुधाला अजूनतरी पर्याय मिळालेला नाही. मात्र, काही बालकांच्या नशिबात ते येत नसल्याने त्यांना मृत्यूलाही कवटाळावे लागते. समाजातील ही उणीव भरून काढण्यासाठी स्थापन झालेल्या मदर मिल्क बँकेने हजारो बालकांना जीवदान देण्यासोबतच भविष्याची पहाटही दाखवली आहे. गेल्या पाच वर्षांत पीडीएमसी येथील मदर मिल्क बँकेने साडेसहा हजारांहून अधिक बालकांना आईचे दूध मिळवून दिले आहे.

रोटरी क्‍लब ऑफ मिडटाउनने पाच वर्षांपूर्वी डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय येथे मदर मिल्क बँकेची स्थापना केली. आईच्या प्रेमासह दुधापासून वंचित राहणाऱ्या बालकांना जन्मतःच पालन पोषण मिळावे, या उद्देशाने या बँकेची निर्मिती झाली. गेल्या पाच वर्षांत या बँकेतून साडेसहा हजार बालकांची दुधाची भूख भागविल्या गेली. यावरूनच या बँकेचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. प्रसूतीदरम्यान मातेचा मृत्यू झाला किंवा काही अपरिहार्य कारणास्तव मातेला बालकास दूध देणे अशक्‍य झाल्यास अशा कठीण समयी ही बँक बालकाच्या मदतीला समोर आली आहे. यासाठी जात, धर्म व पंथ न बघता मातांना दूध दान करण्यासाठी समूपदेशनाच्या माध्यमातून प्रेरित केले जाते. त्यांच्याकडून प्राप्त होणाऱ्या दुधातून गरजू बालकांची भूख मिटवण्यात येते.

मध्य भारतातील ही पहिली मिल्क बँक असून त्यानंतर वर्धा, जळगाव, औरंगाबाद, नागपूर येथेही अशा बँकांची निर्मिती करण्यात आली आहे, अशी माहिती डॉ. राजेश बूब व सुभाष यादव यांनी दिली.

आवश्‍यकता काय -
साधारणतः जन्माच्या वेळी बालकाचे वजन दोन ते अडीच किलोच्या जवळपास असल्यास ते बाळ सुदृढ समजले जाते. परंतु, बरेचदा जन्मतः बाळाचे वजन अतिशय कमी असणे, नियोजित वेळेपूर्वीच बाळाचा जन्म होणे, यामुळे जन्मणारे बालक आरोग्याच्या दृष्टीने कमजोर राहते व त्याच्या जीवितास धोका असतो. अशावेळी त्याला या दुधाची आवश्‍यकता राहते. ती गरज या बँकेच्या माध्यमातून पूर्ण केली जाते.

समूपदेशन व प्रक्रिया -
मदर मिल्क बँकेत कार्यरत डॉक्‍टर व परिचारिका प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांचे समूपदेशन करून त्यांना दूध दान करण्यासाठी प्रेरित करतात. त्यानंतर सकिंग मशीनने दूध संकलित करून ते एका निश्‍चित तापमानावर ठेवले जाते. त्याची तपासणी केल्यानंतर ते बालकांना दिले जाते. पीडीएमसीने यासाठी विशेष योगदान देत प्रशिक्षित कर्मचारी वर्ग उपलब्ध करून दिला आहे. यासोबतच डॉ. मुरके हॉस्पिटल येथेही मिल्क बँक स्थापन झाली असून डॉ. पुष्पा जुनघरे, सोमवंशी, डॉ. प्रांजली शर्मा, डॉ. कल्पना राठी, डॉ. आशीष मशानकर व डॉ. शोभा पोटोडे यांच्या सहकार्याने रोटरी क्‍लब ऑफ अमरावती मिडटाउनची ही बँक सुरू आहे.   
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan East Assembly Election 2024 Result Live: कल्याण पूर्वमध्ये उद्धव ठाकरे गटाला धक्का; सुलभा गायकवाड यांचा दणदणीत विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: महाराष्ट्रानं मतदान केलंय की ईव्हीएम नं केलंय; आदित्य ठाकरेंचा सवाल

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले आघाडीवर

Santosh Bangar Won Kalmanuri Assembly Election 2024 Result : संतोष बांगर विजयी; डॉ. संतोष टारफे यांचा पराभव

Ulhasnagar Assembly Election 2024 Result Live: उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता; कुमार आयलानी यांचा विजय, ओमी कलानींना धक्का

SCROLL FOR NEXT