mla dharmarao atram will give to special gift to party which won one sided grampanchayat election 
विदर्भ

'ग्रामपंचायत बिनविरोध निवडून या अन् २५ लाखांची भेट घ्या'

मिलिंद उमरे

अहेरी (जि. गडचिरोली) : सध्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत घातल्या आहेत. अहेरी विधानसभा मतदार संघातील ग्रामपंचायत सर्वानुमते बिनविरोध निवडून आल्यास विशेष भेट म्हणून त्या ग्रामपंचायतीला २५ लाखांचा विकास निधी देणार असल्याची माहिती माजी राज्यमंत्री तथा अहेरी विधानसभा मतदार संघातील विद्यमान आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी दिली आहे.

प्रसिद्धिपत्रकात आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी म्हटले आहे की, ग्रामपंचायत ही सर्वोच्च सभागृहाचा दर्जा प्राप्त स्थानिक स्वराज्य संस्था असून विकास कामाचे ग्रामपंचायत हे केंद्रबिंदू बनले आहे. गावात एकोपा व संघटन टिकून असले की, गावाच्या विकासासाठी व कायापालटासाठी कोणीच रोखू शकत नाही. त्यामुळे ग्रामपंचायत बिनविरोध निवडून आल्यास अशा ग्रामपंचायतीला २५ लाखांचा विकास निधी देण्यात येईल. 

'गावाच्या विकासासाठी' या संकल्पनेतून आपले हे ध्येय असून सर्वसंमतीने ग्रामपंचायत सदस्यांची व सरपंचांची बिनविरोध निवड केल्यास एक वेगळा पायंडा तयार होईल व एक आदर्श इतिहास रचला जाईल. अशा ग्रामपंचायतींना गौरव व प्रोत्साहन म्हणून आपण २५ लाखांचा विकास निधी देऊ आणि सोबतच गावाच्या अन्य कोणत्याही विधायक कामांसाठी पुढाकार घेऊन विशेष लक्ष पुरविले जाईल, असेही आमदार आत्राम यांनी म्हटले आहे. ग्रामीण भाग व खेडी स्वयंस्फूर्त स्वावलंबी व्हावीत, हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे उद्दिष्ट असून आपणसुद्धा त्यासाठीच धडपड करीत आहोत, असेही ते म्हणाले. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT