file photo 
विदर्भ

आमदार रवी राणांनी दिली जीवे मारण्याची धमकी, एआयएमआयएम नगरसेवकाचा आरोप 

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : विधानसभा निवडणूक मतमोजणीच्या आदल्या दिवशी आमदार रवी राणा यांनी फोनवरून आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप एआयएमआयएमच्या नगरसेवकांनी केला आहे. याविरोधात एआयएमआयएमच्या समर्थकांनी बुधवारी पोलिस आयुक्तालयावर धडक दिली. 

नगरसेवक अब्दुल नाजीम अब्दुल रऊफ हे घरी असताना त्यांना दुपारी तीन वाजून 22 मिनिटांनी आमदारांचा फोन आला. त्यांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप अ. नाजीम यांनी पोलिस आयुक्त संजय बाविस्कर यांना दिलेल्या निवेदनातून केला. अ. नाजीम हे महापालिकेत एआयएमआयएमचे गटनेते आहेत. आपल्याविरुद्ध आमदारांकडून षडयंत्र रचल्या जाण्याची शक्‍यताही त्यांनी तक्रारीत नमूद केली. शिवाय आपल्याला पोलिसांनी सुरक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी सीपींना दिलेल्या निवेदनातून केली. 

संबंधित नगरसेवकाने खासदार नवनीत राणा यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने त्यांच्या विरुद्ध आम्ही कारवाई करणार आहोत. या कारवाईपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी त्यांनी हा आरोप केला असून आरोपात तत्थ्य नाही. 
- रवी राणा, आमदार, बडनेरा. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Vidhansabha: गणपत गायकवाडांनी ज्यांच्यावर गोळ्या झाडल्या त्या महेश गायकवाडांची शिवसेनेतून हकालपट्टी

बाल्कनीच्या कठड्यावर पाय मोकळे सोडून ती... दिव्या भारती कशी पडली? २१ वर्षानंतर अभिनेत्रीचा मोठा खुलासा

अशी ही बनवाबनवीच्या यशात महेश कोठारेंचाही होता वाटा ; सिनेमा सुपरहिट झाल्यानंतर निर्मात्यांनी दिली शाबासकी

Assembly Election 2024: पंतप्रधानांच्या प्रचार दौऱ्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला दीड तास उशीर?

Uddhav Thackeray: भिवंडीत माजी आमदार रुपेश म्हात्रे यांची हकालपट्टी, उद्धव ठाकरेंवर केली होती टीका

SCROLL FOR NEXT