more than 100 people suffer from dengue in chandur railway of amravati 
विदर्भ

चांदूररेल्वेत शंभरच्यावर डेग्यूंचे रुग्ण, प्रशासन अनभिज्ञ

विवेक राऊत

चांदूररेल्वे (अमरावती)- मागील सात महिन्यांपासून सुरू असलेल्या कोरोनाच्या दहशतीत सर्वसामान्यांना इतर आजारांचा विसर पडला असला तरी ते थांबलेले नाहीत. सध्या डेंग्यू शहरात डोके वर काढत आहे. गेल्या पंधरा दिवसांत तालुक्‍यात 100 च्यावर रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे विविध रुग्णालयांतील अहवालावरून दिसून येत आहे. मात्र, ग्रामीण रुग्णालय आणि तालुका प्रशासन यापासून अनभिज्ञ असल्याचे बोलले जात आहे.

मागील आठवड्यात सतत सुरू असलेली पावसाची उघडझाप, वातावरणातील दमटपणा, डासांची वाढती संख्या यामुळे तालुक्‍यातील इतर रोगराईत वाढ झाली आहे. शहरातील विविध खासगी रुग्णालयांतील माहिती घेतली असता 100 रुग्ण संपूर्ण तालुक्‍यात आढळून आले, तर एकट्या चांदूररेल्वे शहरात 60 ते 70 च्यावर डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात डेंग्यूचा शिरकाव झाला असून डेंग्यूसदृश आजाराच्या रुग्णातही झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सतत सुरू असलेला पाऊस यामुळे रोगराईत वाढ झाली आहे. येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढली असून सर्दी, खोकला यासोबत विषाणूजन्य आजारांतही वाढ झाली आहे. गेल्या महिन्याभरापासून येणाऱ्या रुग्णांत पांढऱ्या व तांबड्या रक्तपेशी कमी होत असल्याचे प्रमाण आढळून येत आहे.

डासांमुळे हा आजार होत असून सर्वत्र स्वच्छता बाळगणे गरजेचे आहे. शहरातील डॉ. क्रांती ढोले, डॉ. सागर वाघ यांच्याशी चर्चा केली असता त्यांनीही या वृत्ताला दुजोरा देत तालुक्‍यातील अनेक गावांसह शहरातील इंदिरानगर, रामनगर, भारतनगर, विरूळ रोड व मंगलमूर्तीनगर परिसरात डेंग्यूंचे रुग्ण प्रचंड प्रमाणात वाढत असल्याची माहिती आहे.

डेंग्यू तपासण्याची सोय नाही -
तालुक्‍यात डेंग्यूने थैमान घातले असतानाच स्थानिक ग्रामीण रुग्णालयात या आजाराचे रक्त तपासण्याची सोय नाही. संशयित रुग्णाचे रक्त नमुने बाहेर पाठवून त्यानंतर आजाराचे निदान होते. लगेच या तापाचे निदान झाल्यास त्यावर उपाय करणे शक्‍य होते. परंतु, येथे रक्ततपासणीची सोय नसल्याचे डॉ. मरसकोल्हे यांनी सांगितले.

शहरातील परिस्थिती विदारक -
शहरात आणि तालुक्‍यात डेंग्यूची परिस्थिती विदारक असून दररोजच्या ओपीडीमध्ये 10 च्यावर डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. गेल्या 10 दिवसांत 100 च्यावर रुग्ण आपण तपासले असल्याचे डॉ. क्रांतीसागर ढोले यांनी सांगितले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

बॉक्सर इमाने खलीफ पुरूष असल्याचा वैद्यकिय रिपोर्ट समोर येताच Harbhajan Singh ची 'गोल्ड मेडल' परत करण्याची मागणी

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

SCROLL FOR NEXT