विदर्भ

दुर्दैवी घटना! गोंदिया जिल्ह्यात तलावात बुडून आई-मुलाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

गोरेगाव (जि. गोंदिया) : तलावात बुडून मुलासह आईचा मृत्यू (Death of mother with child) झाला. ही घटना हिरापूर येथे सोमवारी (ता. २१) घडली. सागर खेमराज धुर्वे (वय १०) व वच्छला धुर्वे (वय ४९) अशी मृतांची नावे आहेत. तसेच नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्‍यातील वाकी गावालगत असलेले निसर्गरम्य वातावरण व द्वारका वॉटर पार्कमध्ये नागपूर येथील आठ युवक फिरायला आले होते. यापैकी चार युवकांचा कन्हान नदीच्या पात्रातील डोहात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. (Mother-and-child-drown-in-lake-in-Gondia-district)

सागर धुर्वे हा तलावाच्या परिसरात सोमवारी सकाळी रेडे चारण्यासाठी गेला होता. सायंकाळच्या सुमारास रेडे घरी परत आले. पण सागर घरी आला नाही. त्यामुळे सागरची आई वच्छला त्याला पाहण्यासाठी तलावाच्या दिशेने गेली. पाऊस पडल्याने तलावातील खड्ड्यात पाणी साचले आहे. ती सागरला पाहण्याच्या निमित्ताने तलावात गेली. पण, ती रात्र होऊनही घरी परत आली नाही. त्यामुळे कुटुंबातील सदस्य व गावकरी तलावाच्या दिशेने गेले असता एका खड्ड्यात साडी तरंगताना दिसली.

गावकऱ्यांनी शोधायला सुरुवात केली असता वच्छला धुर्वे हिचा मृतदेह आढळला. तिला पाण्यातून बाहेर काढण्यात आले. रात्र असल्याने सागर धुर्वे हा आढळून आला नाही. त्यामुळे मंगळवारी सकाळी गावकरी व कुटुंबातील सदस्यांनी तलावात शोधाशोध केली असता दुसऱ्या खड्ड्यात सागरचा मृतदेह आढळून आला. आई व मुलाचा बुडून मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नागपुरातील वाकी येथे चौघांना जलसमाधी

नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्‍यातील वाकी गावालगत असलेले निसर्गरम्य वातावरण व द्वारका वॉटर पार्कमध्ये नागपूर येथील आठ युवक फिरायला आले होते. यापैकी चार युवकांचा कन्हान नदीच्या पात्रातील डोहात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी कन्हान नदीपात्राच्या डेंजर डोहात घडली. मित्रांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना त्यांचा जीव वाचवता आला नाही. पोलिसांनी गोताखोरांच्या मदतीने चारही मृतदेह शोधण्यास सुरुवात केली. गोताखोरांना फक्त एका युवकाचा मृतदेह आढळून आला. उर्वरित तिघांचे मृतदेह शोधण्याचे कार्य सुरू होते. परिसरात पाऊस सुरू असल्याने शोधकार्यात मोठी अडचण येत आहे.

(Mother-and-child-drown-in-lake-in-Gondia-district)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मजुराच्या पोटी जन्म, मेहनतीने राजकारणात नाव कमावलं, आता बनले श्रीलंकेचे राष्ट्रपती, कोण आहेत अनुरा कुमारा दिसानायके?

Chess Olympiad 2024: भारताने जिंकले ऐतिहासिक सुवर्णपदक! महिला-पुरुष दोन्ही संघ ठरले 'अव्वल'

अंधेरीचा राजाच्या विसर्जनादरम्यान बोट उलटली; १० ते १२ जण पाण्यात पडले, पाहा थरारक व्हिडिओ

Mega Block : रेल्वेच्या मेगा ब्लॉक मुळे मुंब्रा, दिवा, कोपर वासियांचे मेगा हाल

Sharad Pawar : यशवंतराव चव्हाणांसोबतचे 5 दशकापूर्वीचे छायाचित्र पाहून पवारांना झाला आनंद

SCROLL FOR NEXT