विदर्भ

अमरावती : तीनशे फूट टॉवरवर विरूगिरी; तिघांनी उचलला वीडा

सकाळ डिजिटल टीम

परतवाडा (जि. अमरावती) : परतवाडा स्थानिक फिनले मिल कर्मचाऱ्यांना वेतन पूर्ण द्यावे, नफ्यात असलेली फिनले मिल लवकरात लवकर सुरू करावी, यासह अन्य मागण्यांसाठी सोमवारी गिरणी कामगार संघाचे पदाधिकारी बॉयलरचा टॉवरवर चढत शोले स्टाईल आंदोलन केले. मागण्या मान्य होईस्तोवर आम्ही इथेच राहून आंदोलन करणार असल्याचेही आंदोलन कर्त्यांनी सांगितले आहे.

स्थानिक फिनले मिल अनेक महिन्यांपासून बंद असून, बरेचदा शासनाला निवेदन सुद्धा देण्यात आली. आंदोलनसुद्धा करण्यात आलीत. तरीसुद्धा मिल सुरू झाली नाही. येथील कामगारांना रुजू सुद्धा करून घेतले गेले नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. मिल बंद असल्यामुळे कामगारांची परिस्थिती दयनीय आहे. त्यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ आलेली आहे.

सध्या मिल बंद असल्यामुळे कामगार नैराश्याच्या गर्तेत गेला आहे. असेच सुरू असल्यास भविष्यात अनेक कामगार आत्महत्येच्या मार्गावर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व बाबींवर गिरणी कामगार संलग्न भारतीय मजदूर संघ यांनी निवेदने दिली. परंतु, कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. मिल सुरू न झाल्याने आम्ही आता जीवघेणे आंदोलन करीत आहोत. कामगारांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आम्ही टोकाची भूमिका घेऊ याची सर्वस्वी जबाबदारी एनटीसी प्रशासनाची राहील.

जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत आम्ही या टॉवरवरच बसू, इथेच उपोषण करू असा इशारा टॉवरवर चढलेल्या आंदोलनकांनी दिला आहे. अभय माथने, धर्मा राऊत व दिनेश उघडे अशी टॉवरवर चढलेल्या तिघांची नावे आहेत. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथेच बसवू अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे. सुरू असलेले आंदोलनाने परिसरात पोलिसांचा फौजफाटाही दाखल झालेला आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Patil: पवारांची साथ मिळूनही हर्षवर्धन पाटलांसाठी निवडणूक सोप्पी नाही? घरातूनच बसला धक्का

Pune News : नव्या पाहुण्यासाठी हवा सरकारी दवाखाना; खासगीपेक्षा अधिक पसंती, अडीच वर्षांत ६९ हजार प्रसूती

Sakal Podcast: अमेरिकेत ट्रम्प येणार की हॅरिस? ते अर्जुन तेंडुलकर CSK च्या जर्सीत दिसणार?

आपापल्या उमेदवारांसाठी ‘हे’ १७ बडे नेते सोलापुरात! पंतप्रधान मोदी, राहुल गांधी, शरद पवार, योगी, रेवंथ रेड्डी, सिद्धरामय्या, उद्धव व राज ठाकरे, ओवैसी यांच्या प्रचारसभा, वाचा...

कौटुंबिक वारसा जपताना...

SCROLL FOR NEXT