नागपूर : शिवसेनेच्या खासदार भावना गवळी (MP Bhavana Gawali) यांच्या पाच संस्थांवर आज ईडीने छापेमारी (ED raid on Bhavana gawali organization) केली आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी घोटाळ्याचे आरोप केले होते. त्यानंतर ही ईडी चौकशी झाली आहे. त्यानंतर आता खासदार गवळींनी पहिलीच (Bhavana gawali reaction on Ed raid) प्रतिक्रिया दिली आहे.
ईडीने केलेल्या कारवाईबाबत खासदार भावना गवळी म्हणाल्या, ''भाजपने जुलमी सत्र सुरू केले आहे. मला कुठलीही ईडीची नोटीस आलेली नाही. माझ्या काही संस्थामध्ये ईडीचे अधिकारी आले आहेत. ते चौकशी करत आहेत. आणीबाणीसारखी वागणूक दिली आहे. सर्व शिवसेनेच्या लोकांना टार्गेट केले जात आहे.''
माझ्या संस्थेचा एफआयआर मी स्वतः नोंद केला होता. कारण मला हिशोब लागत नव्हता. एकच मुद्दा पकडून तो ट्विट करायचा आणि राईचा पर्वत करायचा, असा खेळ काही नेत्यांनी मांडला आहे, असा टोला त्यांनी किरीट सोमय्या यांना लगावला आहे. माझ्या शिक्षण संस्थांमध्ये ग्रामीण भागातील मुले शिक्षण घेत आहेत. विद्या देण्याचे काम होत आहे. या भागाची पाच टर्म म्हणून मी खासदार म्हणून काम करत आहे. मी चांगले काम करत आहे ते त्यांना पाहवत नाही, असेही त्या म्हणाल्या.
दरम्यान, बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्याच्या संदर्भात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सक्तवसूली संचालनालयाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत ईडीने सोमवारी सकाळी 11 वाजता चार पथकात चार ठिकाणी धडक दिली. यामधे रिसोड तालुक्यातील देगाव येथील बालाजी पार्टीकल बोर्ड कारखाना, दोन शिक्षण संस्था तसेच मालेगाव तालुक्यातील शिरपूर येथील एका शिक्षण संस्थेचा समावेश आहे. सध्या कारवाई सुरूच आहे. या कारवाईने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. ईडीची ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरित असून भाजप त्याचा गैरवापर करीत असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.