नागपूर : सत्ताधारी आणि तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यातील संघर्ष संपूर्ण शहरवासींनी बघितला. कोरोनावर नियंत्रणासाठी मुंढेंनी उचललेल्या पावलावर सडकून टीका करण्याची कुठलीही संधी न गमावणाऱ्या सत्ताधाऱ्यांनाही आता त्यांनी केलेल्या उपाययोजनांची आठवण होत असल्याचे चित्र आहे. कोरोनासंबंधी दररोज प्रसारमाध्यमे किंवा 'फेसबुक लाइव्ह'द्वारे जनतेपर्यंत आवश्यक माहिती पोहोचविण्याच्या 'मुंढे पॅटर्न'चीच मागणी सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आली.
कोरोनाचा ज्वर वाढला आहे. त्यामुळे लोकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यात महापालिका प्रशासनाकडून कोरोनामुळे गंभीर झाल्यास अॅम्बुलन्स कुणाकडे मागावी? कुठल्या रुग्णालयात बेड रिकामे आहे? ऑक्सिजनयुक्त, व्हेंटीलेटरयुक्त बेड कुठे मिळेल? याबाबत कुठलीही माहिती सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविली जात नाही. त्यामुळे नागरिकांत जास्त चिंतेचे वातावरण आहे. जून, जुलै, ऑगस्टमध्ये तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रसारमाध्यमे तसेच फेसबुक लाईव्हद्वारे जनतेपर्यंत कोरोनासंबंधी उपाययोजनांचीच माहितीच नव्हे तर त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याचाही प्रयत्न केला. त्यांचा शेवटच्या कर्मचाऱ्यावर असलेल्या वचक नागरिकांना दिलासा देणारा होता. परंतु, त्यांनी सत्ताधाऱ्यांशी कधीही जुळवून घेतले नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनीही त्यांच्या अनेक निर्णयावर टीका केली. ते एककल्ली वागत असल्याचेही सांगितले. आता कोरोनाच्या काळात त्यांनीच केलेल्या उपाययोजनांची मागणी सत्ताधारी बाकावरील ज्येष्ठ नगरसेवक व आमदार प्रवीण दटके यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे केली.
हेही वाचा - घनदाट जंगलात अजूनही उभा आहे अष्टकोनी वाडा, २०० एकर जमीनदारी असलेला परिवार एका रात्रीत...
दटके यांनी जनतेपर्यंत कुठलीही माहिती प्रशासन पोहोचवित नसल्याचा आरोप केला. दटके यांनी काल प्रशासनाने दररोज प्रसारमाध्यमाद्वारे तसेच इतरही शक्य माध्यमाद्वारे शहरात किती रुग्णालयांत किती बेड आहेत? व्हेंटीलेटरयुक्त, ऑक्सीजनयुक्त बेड तसेच आयसीयूबाबत दररोज सामान्य नागरिकांपर्यंत माहिती पोहोचविण्याची आग्रही मागणी केली. त्यांनीच नव्हे तर सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, दिव्या धुरडे, माजी महापौर नंदा जिचकार, महेंद्र धनविजय या सत्ताधारी बाकावरील साऱ्यांनीच कोरोनाच्या उपाययोजनांवरून ढिम्म प्रशासनावर आगपाखड केली. या सर्वांनीच प्रशासनाला धारेवर धरताना मुंढेंनी केलेल्या उपाययोजनांचीच मागणी केली. त्यामुळे सभागृहादरम्यान तुकाराम मुंढे यांच्या कामाची अनेकांना आठवण झाली नसेल तर नवलच!
हेही वाचा - घनदाट जंगलातून वाट काढत बदलतेय ९ गावांचे भाग्य, अवघ्या २१ व्या वर्षी नक्षलग्रस्त भागात बनलीय सरपंच
मुंढे प्रशंसकांकडूनही आगपाखड -
काँग्रेसचे नगरसेवक कमलेश चौधरी तुकाराम मुंढे यांचे मोठे प्रशंसक होते. मुंढेंवर टीका करणाऱ्या सत्ताधाऱ्यांविरोधातही चौधरी यांनी आंदोलन केले. त्यांनीही काल दटके यांच्या स्थगनवर बोलताना प्रशासनाकडून व्हेंटिलेटर कुठे आहे? याबाबत काहीही माहिती दिली जात नसल्याबाबत संताप व्यक्त केला. कोरोनाच्या उपाययोजनांबाबत प्रशासन गंभीर नसल्याचाही आरोप त्यांनी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.