मेंदूविकाराचे परिणाम दीर्घकालीन असतात. १० टक्के मेंदूरोग रुग्णांना अक्षम करतात.
नागपूर - मेंदूविकाराचे परिणाम दीर्घकालीन असतात. १० टक्के मेंदूरोग रुग्णांना अक्षम करतात. मागील दहा वर्षांत मद्यप्राशनाचे प्रमाण प्रचंड वाढले असून यामुळे रोज १५ लोकांचा मृत्यू होतो. यात अल्पउत्पन्न गटातील व्यक्तींची समावेश अधिक असतो, अशी माहिती डब्ल्यूएफएनचे विश्वस्त व प्रसिद्ध मेंदूरोगतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी मेंदू सप्ताहानिमित्त आयोजित जागतिक चर्चासत्रात सादर केली.
डॉ. मेश्राम म्हणाले, मादक पदार्थांचे दुरुपयोग आणि मेंदूचे आरोग्य या विषयावर जनजागृती करणे ही काळाची गरज आहे. दिल्ली येथील ‘एम्स’ द्वारे २०१९ मधील अभ्यासानुसार, भारतात सुमारे १६ कोटी लोकं अल्कोहोलचा वापर करतात. यापैकी अंदाजे ३ कोटी कट्टर मद्यपी आहेत. अल्कोहोल व्यतिरिक्त, भारतामध्ये गांजाच्या विविध प्रकाराचे जवळपास ३ कोटी वापर करतात. सुमारे २.३ कोटी ओपिओइडचे वापरकर्ते आहेत.
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार ड्रग्ज आणि अल्कोहोलच्या व्यसनामुळे झालेल्या आत्महत्यांची संख्या गेल्या १० वर्षांत दुप्पटीने वाढली आहे, असे नवी दिल्लीच्या इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन बिहेव्हियर अँड अलाइड सायन्सेसचे डॉ. राजिंदर धमिजा म्हणाले. कोरोनाच्या २ वर्षांत औषध वापरणाऱ्यांसमोर मोठी आव्हाने उभी राहिली आहेत.
मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सुधीर भावे म्हणाले, व्यसन हा उपचार करण्यायोग्य आजार आहे, हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहचवण्याची गरज आहे. मेंदूवर होणाऱ्या प्रभावामुळे, अल्कोहोलमुळे तीन प्रकारची मनोवैज्ञानिक लक्षणे उद्भवू शकतात. त्यात अल्कोहोलची नशा, अल्कोहोल विड्रॉवल आणि दीर्घकालीन मानसिक आजारपण यांचा समावेश असतो.
व्यसनाधिनतेवर वेळीच उपचार हवेत
व्यसन हा मधुमेह, कर्करोग आणि हृदयविकार यांसारखा आजार आहे. आनुवंशिक घटकांसह वर्तणूक, मानसिक, पर्यावरणीय आणि जैविक घटकांच्या संयोगामुळे होतो. व्यसनाचा उपचार केला नाही तर परिणामांमध्ये अनेकदा शारीरिक आणि मानसिक आरोग्य विकारांचा समावेश होतो. वेळेत योग्य उपचार न केल्यास व्यसन अधिक तीव्र, अक्षम करणारे आणि जीवघेणे बनू शकते, असे डॉ. मेश्राम म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.