150 e-buses Proposal to nagpur municipal center demand under PME bus scheme sakal
नागपूर

Nagpur News : शहराच्या ताफ्यात १५० ई-बसेस येणार; मनपाचा केंद्राला प्रस्ताव, पीएमई बस योजनांतर्गत मागणी

मनपालाही ई-बसेस मिळाव्यात म्हणून राज्य सरकारला मनपाद्वारे प्रस्ताव पाठविण्यात आला

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : उपराजधानीतील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी मनपाने पुढाकार घेतला आहे. यासाठी केंद्र सरकारच्या योजनांमार्फत १५० ई-बसेसची मागणी केली आहे. केंद्र शासनाच्या गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाद्वारे पीएम ई-बस योजना सुरू करण्यात आली आहे. मनपालाही ई-बसेस मिळाव्यात म्हणून राज्य सरकारला मनपाद्वारे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

महानगरपालिकेद्वारे ‘आपली बस’ ही शहर परिवहन सेवा दिली जाते. सध्या मनपाच्या परिवहन विभागातर्फे सार्वजनिक बस सेवा ही पारंपारिक डिझेल इंधनावरून अपारंपरिक इंधनाकडे वळविण्याचे धोरण राबविण्यात येत आहे. या अंतर्गत ‘आपली बस’च्या ताफ्यात ई-बसेसचा समावेश करण्यात आलेला आहे.

मार्गदर्शक तत्वांची पूर्तता

ई-बसेस सुरू होण्यापूर्वी शहरांना वीज व पायाभूत सुविधांची पुरेशी क्षमता सुनिश्चित करावी लागेल आदी बाबी केंद्राच्या ‘पीएम ई-बस’ योजनेच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये अंतर्भूत आहेत. या तत्त्वांचा अवलंब करून परिवहन विभागाच्या वतीने रितसर प्रस्ताव तयार करण्यात आला व तो प्रस्ताव सर्व आवश्यक बाबींची पडताळणी करून आयुक्तांनी राज्य शासनाला पाठविला आहे.

शहरातील सध्याची स्थिती

  • ५२८ : एकूण सेवेत बस

  • १६७ : स्टॅंडर्ड बस

  • १५० : मिडी बस

  • ४५ : मिनी बस

  • ३६२ : डिझेल बस

  • ७० : रेट्रोफिटींग सीएनजी बस

  • ९६ : ई बसेस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT