flood water esakal
नागपूर

Nagpur District Flood : नागपूर जिल्ह्यातील १५० गावांना पुराचा धोका

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - पावसाळ्यात नदी, नाल्यांना निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीमुळे जीव, वित्त हानीसोबतच पिकांचे नुकसान होते. जिल्ह्यातील १५७ गावांना पुराचा धोका आहे. ही सर्व गावे नदीलगत आहेत. यात सर्वाधिक गावे सावनेर तालुक्यातील आहेत.

जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून पाऊस येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मान्सूनपूर्व तयारीचा आढावा प्रशासनाकडून घेण्यात आला असून, आवश्यक सर्व तयारी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. मागील वर्षी अतिवृष्टीमुळे अनेक गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसला. मोठ्या प्रमाणात शेतपिकांचे नुकसान झाले. तर काहींचा मृत्यूही झाल्याची माहिती आहे. पुराच्या पाण्यामुळे जनावरांचाही मृत्यू झाला. अनेकांच्या घरांचे नुकसान झाले.

अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण होते. याच्यामुळे होणाऱ्या नुकसानाचा सर्वात मोठा धोका नदीकाठच्या गावांना असतो. जिल्ह्यातील १५७ गावांना पुराचा धोका आहे. ही सर्व गावे नदी, नाल्यालगत असल्याचे समजते. यात सर्वाधिक ३४ गावे सावनेर तालुक्यातील आहेत. त्यापाठोपाठ कामठीतील २२ तर मौदा तालुक्यातील २० गावांना पुराचा धोका आहे.

५०० आपदा मित्र नियुक्त

पूर परिस्थितीमुळे जीव हानी होता कामा नये. अशा परिस्थितीत तत्काळ मदत मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आपदा मित्रांची नियुक्ती केली. संपूर्ण जिल्ह्यात ५०० आपदा मित्र नियुक्त करण्यात आले. यात ३११ पुरुष तर १८९ महिला आहे. या सर्वांना प्रशिक्षण ही देण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार तालुकानिहाय मॉक ड्रीलही घेण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT