2 men in nagpur do theft only if they do not money  
नागपूर

अजब चोरट्यांचा अजब कारभार! खिशातील पैसे संपल्यानंतरच करायचे चोरी; इतरवेळी इमानदारी 

अनिल कांबळे

नागपूर ः गेल्या अनेक दिवसांपासून वॉंटेड असलेल्या चोरट्यांना हुडकेश्‍वर पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली. दोन्ही चोरटे केवळ दारू पार्टी आणि मित्रांसोबत मौजमजा करण्यासाठी चोरी करीत होते. ही कारवाई शनिवारी केली. शुभम दिलिप चाफले (२१, रा. न्यू म्हाळगीनगर) आणि संजय रामप्रसाद हेमने (१९, ब्रम्हनगर) असे अटकेतील चोरट्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम आणि संजय हे दोघेही मित्र असून गुन्हेगारीतूनच दोघांची ओळख झाली होती. अल्पवयीन असतानासुद्धा शुभम गुन्हेगारी कारवायात सहभाही असायचा. खिशातील पैसे संपल्यानंतर दोघेही बंद घराचा शोध घेऊन चोरी करीत होते. 

अमोल दांडेकर (२९, प्रेरणानगर) यांच्या घरी ४ डिसेंबरला महेश आणि गणेश नावाचे मित्र आले होते. मध्यरात्रीच्या सुमारास जेवण केल्यानंतर तिघेही झोपी गेले. पहाटेच्या सुमारास शुभम आणि संजय यांनी खिडकीतून प्रवेश करीत घरातून सोन्या-चांदिचे दागिणे, रोख रक्कम आणि मोबाईल चोरून नेले होते. या प्रकरणी हुडकेश्‍वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. 

ठाणेदार प्रताप भोसले यांना चोरीबाबत गुप्त माहिती मिळाली. त्यांनी लगेच एपीआय स्वप्नील भुजबळ, हवालदार शैलेष ठवरे, प्रवीण गाणार, राजेश डेकाटे, आशिष तितरमारे, सायबर एक्सपर्ट दिपक तऱ्हेकर, मिथून नाईक यांना सापळा रचण्याचे आदेश दिले. पथकाने रचलेल्या जाळ्यात दोघेही चोरटे अलगद अडकले. दोघांनीही चोरीची कबुली दिली असून चोरीचा मालही त्यांच्याकडून हस्तगत केला आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar NCP Second List: अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर! सात नव्या उमेदवारांची घोषणा, वडगाव शेरीचंही ठरलं

शाहरुखच्या 'चक दे इंडिया'च्या बदललेल्या कथेवर अन्नू कपूर संतापले; म्हणाले- मुस्लिम चांगला दाखवून पंडितांची थट्टा...

Share Market Opening: शेअर बाजारात घसरण सुरुच; निफ्टी 24,400च्या खाली, कोणते शेअर्स कोसळले?

Share Market Today: आज कोणते शेअर्स असतील तेजीत? जागतिक बाजारात काय आहेत संकेत?

Ajit Pawar NCP: अजित पवार यांचा धडाका! काँग्रेससह भाजपलाही दिला धक्का; दोन माजी खासदारांसह आमदार राष्ट्रवादीत

SCROLL FOR NEXT