Nagpur Crime  sakal
नागपूर

Nagpur Crime : कुलर कंपनीच्या मालकाची २० लाखांची फसवणूक ; व्यवस्थापकाने बनावट कुलर बनवून विकले

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : बनावट कुलरची राम कुलरच्या नावाने विक्री करून व्यवस्थापकाने इतर तीन व्यावसायिकांच्या मदतीने मालकाची २० लाख रुपयांनी फसवणूक केली. मालक राकेश सूर्यभान अवचट (५०) रा. नवीन शुक्रवारी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चौघांवर गुन्हा नोंदविला आहे. सुधीर चौबे (३४) रा. सुरेंद्रगड, अयुब बंसल (३५), कमल कुमार सिंघल (५९) दोन्ही रा. राजस्थान आणि शैलेश अग्रवाल (३८) रा. रायपूर अशी आरोपींची नावे आहेत.

यातील मुख्य आरोपी सुधीर हा राम कुलर कंपनीत व्यवस्थापक या पदावर होता. तो २०२१ मध्ये कंपनीत कामाला लागला. त्याच्यावर व्यवस्थापनाची संपूर्ण जबाबदारी होती. नागपूरसह इतर राज्यांतील डिस्ट्रिब्यूटर्सशी त्याने चांगली ओळख केली.

कंपनी पॉलिसीनुसार महाराष्ट्रात विकल्या जाणारे कुलर मुळ किमतीत, तर राज्याबाहेर विकल्या जाणाऱ्या कुलरच्या किमती कमी असतात. हीच बाब आरोपीने हेरली. त्याने राजस्थान आणि रायपूरच्या डिस्ट्रिब्यूटर्सशी संगनमत केले. राज्याबाहेर पाठविल्या जाणारे कुलर्स डिस्ट्रिब्यूटर्सला न पाठविता त्यांची परस्पर नागपुरात विक्री केली. यासाठी त्याने कंपनीच्या नावे बनावट बँक खाते उघडले.

होलसेल डीलर्सकडून प्राप्त धनादेश बनावट बँक खात्यात जमा करीत कंपनीची २० लाख रुपयांनी फसवणूक केली. या प्रकरणी अवचट यांनी गणेशपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. यावरून आरोपी सुधीरविरुद्ध गुन्हा नोंदविला तसेच राजस्थान, रायपूर येथील तीन डिस्ट्रिब्यूटर्सलाही यात आरोपी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT