सावनेर (जि. नागपूर) : सावनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वन चाली टाकळी येथे कोरोनाचे कडक निर्बंध(Corona rules) असतांना येथील विराट फार्म हाऊसमध्ये थाटात लग्न सोहळा (Wedding in Corona) सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक निशांत फुलेकर यांच्या भरारी पथकाला मिळताच ग्रामपंचायतच्या संयुक्त विद्यमाने पोलिसांनी लग्नसमारंभात भेट देऊन शहानिशा केली असता केली असता जवळपास तीनशे लोक आढळून आल्याने विराट फॉर्म हाऊसचे संचालक अजय भगवान तिवारी यांच्यावर 50 हजाराची दंडात्मक कारवाई करण्यात आली. (300people in wedding in saoner 50 thousand fine taken)
तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक निशांत फुलेकर यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून रात्रीच्या सुमारास पाटणसांगी कवडस शिवारातील राष्ट्रीय महामार्गावरील धाबे व हॉटेलची शहानिशा केली.
येथील ड्राईव्ह अँड डाईन हॉटेलच्या झडती दरम्यान जिल्हाधिकारी यांनी covid-19 यासाठीच्या रोगाच्या निर्मुलनाकरिता दिलेल्या आदेशाचे पालन न करता लोकांना साथ रोगाचा संसर्ग होईल या पद्धतीने पाटील च्या इमारतीमध्ये चार टेबल वर एकूण 17 लोकांना बसून जेवण देतांना मिळून आल्याने येथील सात आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत
सिद्धार्थ सुनील अग्रवाल वय 36 रा सदर जवाहर चौक नागपूर, रोहित चंद्रकांत सवाईतुल वय 31 राहणार शिवाजीनगर कोराडी, अमित रामदास मडावी 24 राहणार चिमूर जिल्हा चंद्रपूर, अजय मंगलसिंह राठोड 29 राहणार तूरानवळणी जिल्हा यवतमाळ, करण लखन सिंग ठाकूर 35 सिडिया पलारी मध्यप्रदेश, राकेश वासुदेव बावणे 25 चिमूर जिल्हा चंद्रपूर, अंकित संजय मातोडकर 22 वलनी खदान सावनेर अशीच कारवाई पोलिसांनी याच शिवारात एका धाब्यावर केली आहे याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत
(300people in wedding in saoner 50 thousand fine taken)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.