31 bjp worker resigned in wadi nagarparishad of nagpur  
नागपूर

नगराध्यक्षांसह ३१ जणांचा भाजपला रामराम, राष्ट्रवादीत घेणार प्रवेश

विजयकुमार राऊत

वाडी (जि. नागपूर) : भाजपचे माजी जिल्हा महामंत्री व वाडीचे नगराध्यक्ष प्रेम झाडे यांच्यासह ३१ स्थानीय प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राजीनामा दिला. पक्षाच्या पक्षपातीपणा व अन्यायकारक धोरणाचा निषेध करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

माजी नगराध्यक्ष प्रेम झाडे व वाडीतील भाजपचे पदाधिकारी म्हणून कार्य करणारे गणेश राठोड, हिम्मत गडेकर, प्रकाश जुनघरे, मोहन खंडारे, जटाशंकर पांडे यांनी सोमवारी चर्चा व निवेदनाच्या माध्यमातून हा निर्णय घेतला. तसेच पक्षाच्याच आमदार व पदाधिकाऱ्यांनी उघडपणे ज्येष्ठ व कट्टर पदाधिकाऱ्यांवर अन्याय करण्यात आला. त्यानंतर ही बाब स्पष्ट करूनही आमदार समीर मेघे यांच्या दबावाखाली ज्येष्ठ जिल्हा पदाधिकाऱ्यांनी आतापर्यंत कोणतीही कारवाई केली नाही. हे चिंताजनक असल्यामुळे हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी सांगितले. 

विविध आंदोलने, मोर्चे, वाडीबंदसारखे प्रमुख विषय घेऊन झाडेंनी पक्षाला परिसरात क्रियाशील ठेवले होते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून आमदार मेघे व त्यांच्यात वेळीवेळी मतभेद झाले. वाडीतील दवाखान्याच्या मंजुरीसाठी प्रलंबित प्रस्ताव याचाही आमदारांनी पाठपुरावा मंत्रालय स्तरावर केला नसल्याचे ते म्हणाले. त्यामुळे आजही वाडीतील एक लाख जनता आरोग्य सुविधेसाठी वंचित असल्याचा आरोप झाडे यांनी केला. आमदार स्वतः भाजपचे असूनही हेतुपुरस्सर त्यांच्या वार्डला या निधीपासून वंचित ठेवण्यात आले. दरम्यान, एका लाच प्रकरणातही आमदारांची भूमिका संशयास्पद असल्याची भूमिका तक्रारकर्त्यांकडूनच उघड झाल्याने वाडीतील पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला. या सर्व बाबींचा अहवाल जिल्हा भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून, निवेदन देऊन वारंवार सांगून कार्यवाही व न्याय मिळाला नाही. ३१ पदाधिकाऱ्यांनी नुकतीच भाजपचे जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांना भेटून स्थितीची कल्पना देऊन राजीनामे सादर केले. यावर दोन दिवसात योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन देऊनही आज चार दिवस झाल्यानंतर त्यांनी कोणतीही कार्यवाही केली नसल्याचे झाडे यांनी सांगितले. लवकरच राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार असल्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT