Nagpur News  sakal
नागपूर

Nagpur News : पावसाच्या आशेवर पेरणीचा जुगार;जिल्ह्यात ३६ टक्के पेरण्या,धान उत्पादक प्रतीक्षेत

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : जिल्ह्याला अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. जून महिना जवळपास संपायला आला असताना अद्यापही जिल्ह्यात पाहिजे तसा पाऊस झालेला नाही. पण लांबत असलेल्या हंगामामुळे भात वगळता लवकरच पाऊस येईल या आशेवर कापूस, तूर, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी पेरणीस सुरुवात केली आहे. जिल्ह्यात आजवर एकूण नियोजित क्षेत्राच्या तुलनेत जवळपास ३६ टक्के क्षेत्रावर शेतकऱ्यांनी पेरणी केली.

यंदाच्या खरीप हंगामासाठी कृषी विभागाने ४ लाख ७९ हजार ८१० हेक्टरवरील क्षेत्राचे नियोजन केले आहे. गेल्या काही वर्षांतील कापसाचे वाढते क्षेत्र व मिळणारा भाव लक्षात घेता यंदा कापसाचे क्षेत्र सर्वाधिक २ लाख २५ हजार हेक्टर इतके नियोजित आहे. कापूस, तूर, सोयाबीन, मका अशी पिक घेणाऱ्या शेतकऱ्यांनी पेरणीचा सपाटा सुरू केला आहे.

परंतु धानाचे शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. पाऊस लांबल्यास त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढाविण्याची शक्यता नाकारता येत नाही. आजवर जिल्ह्यात प्रमुख पीक असलेल्या कापसाची नियोजित क्षेत्राच्या १.१० लाख हेक्टर, भाताची २३१ हेक्टर, तुरीची २२ हजार १२७ हेक्टर व सोयाबीनची ३४ हजार ९१२ हेक्टर, अशी एकूण नियोजित क्षेत्राच्या १ लाख ६७ हजार ९१० हेक्टरवर म्हणजेच ३५.९३ टक्के पेरणी आटोपली आहे.

असे आहे पीकनिहाय नियोजन

पीक नियोजित क्षेत्र प्रत्यक्ष पेरणी (हेक्टरमध्ये)

सोयाबीन ९०,००० :३४,९१२

तूर ६१,००० :२२,१२७

मका ४००० :४६२

भात ९५,०००: २३१

भूईमूग १२३३ :११८

कापूस २.२५ लाख :१.१० लाख

मुग ३०० :२९

उडीद ३०० :१८

ज्वारी १००० : ७

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT