Nagpur Accident  Sakal
नागपूर

Nagpur Accident : मंगळवार ठरला घातवार, ५ अपघातात ६ ठार

सकाळ वृत्तसेवा

Nagpur : शहरासाठी मंगळवार अतिशय वाईट दिवस ठरला. या दिवशी शहर परिसरात तब्बल ५ अपघातांमध्ये ६ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये तरुण व मध्यमवयीन नागरिकांचा समावेश आहे. सहा कुटुंबांवर दुःखाचे आभाळच कोसळले आहे.

पांजरा येथील बीएसएनएल कार्यालयाजवळ भरधाव कार अनियंत्रित होऊन महामार्गावरील सात बॅरिकेड्सचे रेलिंग तोडून सर्व्हिस रोडवर फेकल्या गेली. कारने चार ते पाच गटांगळ्या खाल्ल्या. या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला.

ही घटना सोमवारी मध्यरात्री २.४५ वाजताच्या सुमारास नागपूर मार्गावरील पांजरा गावाजवळ घडली. यात विक्रम गाडे (२०) रा. महादुला कोराडी, आदित्य पुण्यपवार (२०)रा. चामोर्शी गडचिरोली अशी मृतांची नावे आहेत. तर जय संजय भोंगाडे (२०), सुजल प्रमोद चव्हाण (२०) आणि सुजय राजन मानवटकर सर्व रा. महादुला, अशी जखमींची नावे आहेत. यातील जयची प्रकृती चिंताजनक आहे.

विक्रम गाडे यांच्या घरी पाचही मित्र एकत्र आले होते. दुपारचे जेवण केल्यानंतर रात्री अडीच वाजताच्या सुमारास पाचही मित्र स्विफ्ट कारमध्ये बसून महादुला येथून नागपूरकडे निघाले. महामार्गावरील पांजरा येथील बीएसएनएल कार्यालयाजवळ भरधाव वेगामुळे कार अनियंत्रित झाली व महामार्गावरील सात बॅरिकेड्सचे रेलिंग तोडून सर्व्हिस रोडवर फेकल्या गेली. दरम्यान कारने चार ते पाच गटांगळ्या खाल्ल्या. यात विक्रम गाडे आणि आदित्य पुण्यपवार या दोघांचा जागीच मृत्यू झाला.

मृतांच्या मांसाचे तुकडे आणि हाडे कार आणि रस्त्यावर विखुरली होती. यातूनच अपघाताची भीषणता दिसून आली. जखमींपैकी सुजल चव्हाण आणि सुजय मानवटकर यांना शासकीय रुग्णालयात तर जय भोंगाडे याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विक्रम गाडे हा एल.एल.बी.च्या तृतीय वर्षाला होता.

तर आदित्य पुण्यपवार हा महादुला येथील सोनेकर कॉलेज ऑफ फार्मसीचा द्वितीय वर्षाचा विद्यार्थी होता. आदित्य मित्रासोबत महादुला येथे भाड्याच्या घरात राहात होता. जय आणि सुजल चव्हाण हे दोघे बी.टेक.च्या द्वितीय वर्षाचे विद्यार्थी आहेत. तसेच सुजय मानवटकर हा फार्मसीच्या दुसऱ्या वर्षाला शिक्षण आहे.

मद्यप्राशनाबाबत संशय

पाचही मित्र मद्यप्राशन करून होते का? याबाबत संशय असून पोलिसांनी नमुने वैद्यकीय चाचणीसाठी पाठविले असल्याची माहिती कोराडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रवीण पांडे यांनी दिली.

रिल बनविण्याचा व्हिडीओ व्हायरल

अपघातग्रस्त कार कोण चालवत होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, मित्रांनी कारमधून काढलेली रील समाज माध्यमावर ‘व्हायरल’ होत आहे. रात्री २:३८ वाजता महादुला परिसरातून जात असताना मागच्या सीटवर बसलेला मित्र रील काढताना दिसत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये स्टंटबाजीसह कार चालवली जात असल्याचे दिसून येत आहे. या मार्गावर सीसीटीव्ही लावण्याची मागणी आहे. मात्र, प्रशासनाकडून दखल घेण्यात न आल्याने नागरिकांमध्ये रोष आहे. सीसीटीव्हीमुळे संपूर्ण घटनाक्रम उघडकीस आला असता, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र, खासदार श्रीकांत शिंदेंनी महाकाल मंदिराचे नियम मोडले; मंदिराच्या गर्भगृहात केला प्रवेश

Chh.Sambhajinagar Assembly Election 2024 : विस्तारित भागांना प्रतीक्षा सुविधांची!

एसी जिममध्ये घाम गाळणाऱ्यांना गश्मीर महाजनीने दिला खास सल्ला; म्हणाला- एका चुकीच्या इन्स्ट्रक्टरमुळे मी...

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील हडपसर, कोथरूड, कसबा, शिवाजीनगर, पर्वती या जागांवर मनसे उमेदवार देणार

High Court : कब्रस्थान, दफनभूमीची जागा वापरता येईल? रेल्वे उड्डाणपूल प्रकरणी उच्च न्यायालयाची विचारणा

SCROLL FOR NEXT