नागपूर : नागपुरात कोरोनाची दुसरी लाट (The second wave of corona) हळूहळू ओसरली. रुग्णसंख्येत कमालीची घट (Decrease in the number of patients) झाली. गंभीर संवर्गातील रुग्णांचे प्रमाण घटल्याने मृत्यूचा टक्का खाली आला. यामुळे जिल्ह्यात मेयो, मेडिकल, एम्ससह खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये (Covid Hospital) सुमारे ५ हजार ६६५ वर खाटा रिकाम्या आहेत. काही दिवसांपासून रिक्त खाटांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी झाला आहे. (5,665 beds vacant in Nagpur due to shortage of corona patients)
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगली होती. आरोग्य यंत्रणेचे पितळ उघडे पडले. नागपुरात मार्च, एप्रिलमध्ये नागपूर शहर आणि जिल्ह्यातील शासकीय व खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधितांना खाट मिळणे एकप्रकारचे अग्निदिव्य होते. रुग्णांचे रुग्णवाहिकेत, रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच मृत्यू होत असल्याचे वात्सव पुढे आले होते.
मेडिकल, मेयो, एम्स आदी शासकीय रुग्णालयांत खाटांची संख्या वाढता वाढत होती. शहरातील १४ शासकीय, १५० वर खासगी व १६ वर कोविड केअर सेंटर (सीसीसी) शहरातील कोरोनाबाधितांसाठी कमी पडले होते. ८० हजार कोरोनाबाधित शहरात होते. मात्र, खाटा उपलब्ध होत नसल्याने अनेक जण घरीच उपचार करीत होते. ७८ हजारावर रुग्ण घरीच उपचार सुरू होते.
मेडिकलमध्ये ९००, मेयोत ६०० तर एम्समध्येही ३०० खाटा होत्या. खासगी रुग्णालये तसेच कोविड केअर सेंटरमध्ये ७ हजारांवर खाटा तयार करण्यात आल्या होत्या. यानंतरही रुग्णसंख्येचा आलेख वाढताच होता. एकाच खाटेवर दोन, तीन रुग्णांवर उपचार होत होते. विशेष असेकी नागपुरातील कोरोनाबाधितांची सोय करण्यासाठी अमरावतीला पाठवण्याची वेळ नागपूरवर आली. अनेक रुग्णांना पाठवलेही.
आता चित्र बदलले
जिल्ह्यातील चित्र आता पूर्णपणे बदलले आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आलेख खाली आला. महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार खासगी रुग्णालयांतही जवळपास ऑक्सिजन असलेले २ हजार ०६६, आयसीयूचे १ हजार ३११ व व्हेटिलेटर असलेले १८८ खाटा बुधवारी सायंकाळपर्यंत रिकाम्या होत्या. याच कालावधीत शहरातील मेयो, मेडिकलसह इतर शासकीय रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन असलेले जवळपास १ हजार ७४०, आयसीयूचे २०९ व व्हेंटिलेटर असलेले १६ बेड रिकामे आहेत. शहर व ग्रामीण भागात असलेल्या सीसीसीमध्ये ऑक्सिजनचे जवळपास १३५ वर खाटा रिकाम्या आहेत. जिल्ह्यात एकूण ५ हजार ६६५ वर खाटा रिकाम्या आहेत.
(5,665 beds vacant in Nagpur due to shortage of corona patients)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.