नागपूर : एखाद्या घरातील पाच महिलांसह तब्बल आठ जण अचानक एकाचवेळी कोरोना संक्रमित (corona positive) झाल्यावर त्या कुटुंबाची काय अवस्था झाली असेल, याची कल्पनादेखील करू शकत नाही. दिघोरी परिसरातील आदर्शनगर येथे राहणारे डॉ. अमर मोंढे यांच्या परिवाराने काही महिन्यांपूर्वी हा जीवघेणा अनुभव घेतला. मात्र, प्रबळ इच्छाशक्ती व प्रभावी उपचाराच्या बळावर सर्वांनी कोरोनावर विजय (overcame corona) मिळविला. (8 people from same family overcame corona in nagpur)
'सकाळ'सोबत बा अनुभव शेअर करताना डॉ. मोंढे म्हणाले, आमच्या परिवारात एकूण १४ सदस्य आहेत. मी आणि खापरखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नोकरीवर असलेली आई वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहे. अचानक एके दिवशी आईला ताप आला. डॉक्टरांनी कोरोनाची चाचणी करण्याचा सल्ला दिल्यानंतर चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली. त्यामुळे घरातील सर्वच जणांना रविभवनातील विलगीकरण केंद्रात नेण्यात आले. तिथे आमच्याही चाचण्या करण्यात आल्या. त्यात आठ वर्षीय मुलासह आणखी सात जण पॉझिटिव्ह आले. सर्वांना पुढील उपचारासाठी एम्समध्ये रेफर करण्यात आले. मी या क्षेत्रात असल्यामुळे फारसे टेन्शन घेतले नाही. बाकीच्यांना मात्र एकदुसऱ्याची खूप काळजी वाटत होती. विशेषतः बीपी व शुगरचा त्रास असलेल्या आईबद्दल सारेच चिंतित होते. दोन आठवड्यांच्या यशस्वी उपचारानंतर सर्व जण बरे झाले. ऑक्सिजन लागल्याने आईला यातून 'रिकव्हर' व्हायला थोडा वेळ लागला.
नागपूर व विदर्भातील बातम्या वाचण्यासाठी इथं क्लिक करा...
‘लस वाचवू शकतो जीव'
कोरोनाविरुद्धची लढाई जिंकणारे डॉ. मोंढे यांनी पात्र असलेल्या सर्वांना लस आवर्जून घेण्याचा सल्ला दिला. लसीनंतरही कोरोना होऊ शकतो. मात्र, शरिरात 'अँटिबॉडीज' तयार होत असल्याने जीव जाण्याची शक्यता कमी असते. लसीनंतर काही सौम्य लक्षणे दिसत असली तरी, त्यामुळे घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही. ती सर्वसामान्य प्रक्रिया आहे.
कोरोनाकाळात संक्रमितांनी मानसिकदृष्ट्या मजबूत व सकारात्मक राहणे खूप आवश्यक आहे. आमच्या आईने ते दाखवून दिले. अशा केसेसमध्ये लवकर चाचणी आणि लवकरच उपचारदेखील होणे आवश्यक आहे. लक्षणे आढळून आल्यास लगेच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.-डॉ. अमर मोंढे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.