नागपूर

निंदनीय! पतीने परवानगी दिल्याने दिराने केला वहिनीवर बलात्कार

नीलेश डाखोरे

नागपूर : एकाच घरातील दोन बहिणींशी लग्न केल्यानंतर वडिलांच्या संपत्तीतील वाटा न मागितल्यामुळे सासरच्यांनी हुंड्यासाठी छळ (Persecution for dowry) केला. एवढेच नव्हे तर दिराने वहिनीवर कुटुंबीयांच्या परवानगीने बलात्कार (Atrocities on Vahini) केला. ही धक्कादायक घटना एमआयडीसी परिसरात उघडकीस आली. याप्रकरणी पती, दिरासह नऊ व्यक्तींवर पोलिसांनी गुन्हा दाखल (Charges filed against nine persons) केला आहे. (A-case-has-been-registered-against-nine-persons-in-Nagpur-for-atrocities)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप आणि दीपक हे दोघे भावंडे सीआरपीएफ गेट एमआयडीसी परिसरात राहतात. दोघेही भाऊ भांडखोर प्रवृत्तीचे असल्यामुळे शेजाऱ्यांसोबत पटत नव्हते. फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये दिलीप आणि दीपक या भावंडांनी दवलामेटी परिसरात राहणाऱ्या उच्चशिक्षित दोघ्या बहिणींसोबत लग्न केले. वडील दुधाचा व्यवसाय करीत असल्‍यामुळे दोघीही बहिणींची आर्थिक स्थिती योग्य नव्हती.

लग्न झाल्यानंतर १५ दिवसांतच दिलीप आणि दीपक यांनी दोघांच्याही पत्नीला माहेरून हुंडा आणण्यासाठी तगादा लावला. मात्र, दोघींनीही माहेरून पैसे आणण्यासाठी नकार दिला. त्यामुळे दीपक आणि दिलीप यांनी दोघ्याही बहिणींना कमरपट्ट्याने जबर मारहाण केली. त्यानंतर सासू आणि दोन ननंदनेही त्यांना घरात मोलकरणीसारखी वागणूक दिली.

मोठ्या बहिणीने पतीचा मार सहन केला. परंतु, लहान बहीण सारखी रडत राहत होती. दोघींनाही माहेरून पैसे आणण्यासाठी वारंवार मारझोड होत होती. परंतु, त्या पैसे आणण्यास नकार देत होत्या. त्यामुळे सासरचे लोक दोघींनाही मानसिक व शारीरिक त्रास देत होते. एवढेच नव्हे तर दोघींनीही माहेरी जाण्यास नकार देत असल्यामुळे दोघींचेही पती दीपक आणि दिलीप त्यांच्यावर लैंगिक अत्याचारही करीत होते, असे तक्रारीत म्हटले आहे.

दिरासोबत खोलीत कोंडले

३ फेब्रुवारी २०२१ रोजी मोठी बहीण घरात झोपली होती. त्यावेळी दीर घरात आला. त्याने वहिनीशी अश्‍लील चाळे केले. त्यामुळे ती ओरडली आणि रूमबाहेर आली. त्यावेळी पती, सासू आणि दोन ननंदने तिला दिराशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी बळजबरी केली. तिने नकार देताच दोरीने हात बांधून दिरासोबत रूममध्ये बंद केले. दिराने तिच्यावर पाशवी बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

(A-case-has-been-registered-against-nine-persons-in-Nagpur-for-atrocities)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

सोलापूर जिल्ह्यातील ११ आमदारांनी किती घेतली मते? दुसऱ्या- तिसऱ्या क्रमांकावर कोण? जाणून घ्या, जिल्ह्यातील विजयी अन्‌ दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची मते

Amol Javle Won Raver Assembly Election 2024 Result Live: रावेर विधानसभा मतदार संघातून अमोल जावळे विजयी

SCROLL FOR NEXT