abortion of 9 minor girls per month in nagpur 
नागपूर

धोक्याची घंटा! दर महिन्याला ९ अल्पवयीन मुलींचा गर्भपात, गोळ्यांचीही सर्रास विक्री

राजेश प्रायकर

नागपूर : शहरात अल्पवयीन मुलींच्या गर्भपाताच्या संख्येने पालकांची चिंता वाढवली आहे. शहरात दर महिन्याला नऊ अल्पवयीन मुलींचा गर्भपात होत आहे किंवा करून घेतला जात आहे. ही अधिकृत नोंदणी असून अनधिकृत आकडेवारी यापेक्षाही अधिक असण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे काही मेडिकल स्टोअर्समध्ये गर्भपाताच्या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय दिल्या जात असल्याने अनेकांच्या जिवालाही धोका निर्माण झाला आहे. 

शहरात लैंगिक छळ, अत्याचाराच्या घटना दररोज घडत आहेत. तसेच तरुण-तरुणी सहमतीनेही एकांत गाठतात. संयम न पाळल्या गेल्याने अनेकदा गर्भधारणा होते आणि त्यातून सुटका करण्यासाठी गर्भपाताचा पर्याय शोधला जात आहे. धक्कादायक म्हणजे एप्रिल-डिसेंबर या नऊ महिन्यांत ८१ अल्पवयीन मुलींनी गर्भपात केला किंवा त्यांच्यावर ही वेळ आली. गेल्या एप्रिल ते डिसेंबरपर्यंत शहरात ७ हजार ४२० गर्भपातांची नोंद करण्यात झाली आहे. यातील १९५ अविवाहित महिलांनी गर्भपात केल्याचे समोर आले आहे. लैंगिक छळ, अत्याचाराशिवायही मुक्त विचारधारेच्या महिलांचा यात समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे ८१ अल्पवयीन मुलींनी गर्भपात केला. विशेष म्हणजे यातील काही प्रकरणे लैंगिक अत्याचाराची आहेत. परंतु, काही प्रकरणे निश्चितच पालकांच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे. हे सर्व गर्भपात १२ आठवड्यापूर्वी करण्यात आले. परंतु, ६९९ महिलांनी १२ आठवड्यांनी गर्भपात केला. अपंग बाळ, मतिमंद बाळ, बाळाच्या किंवा आईच्या जिवाला धोका असल्याने या महिलांनी गर्भपात केला. 

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गर्भपात - 
गर्भधारणा झाल्यानंतर अनेकजण आजही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गर्भपात करीत आहेत. मुळात मेडिकल स्टोअर्समध्ये गर्भपाताच्या गोळ्या सहज उपलब्ध होतात. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय या गोळ्यांची सर्रास विक्री सुरू असल्याचे सूत्राने नमुद केले. यातून अनेकदा जीव गमाविण्याची वेळही येत असल्याचे महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. सरला लाड यांनी नमुद केले. 

बाहेर खासगी मेडिकल स्टोअर्समधून डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय गोळ्यांच्या विक्रीवर बंदी घालणे आवश्यक आहे. कधी-कधी गर्भात जुळे मुले असते. गर्भपाताच्या गोळीने एकाचाच गर्भपात होतो. दुसरे मूल असल्याचे काही दिवसांनंतर कळल्यानंतर अनेकदा गर्भवतीपुढे नवे संकट निर्माण होते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच गर्भपात करणे योग्य आहे. 
- डॉ. सरला लाड, आरोग्य अधिकारी, मनपा. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Whatsapp Call Recording : मिनिटांत रेकॉर्ड करा व्हॉट्सॲप कॉल, सोपी स्टेप वाचा एका क्लिकमध्ये..

Margashirsha Amavasya 2024: मार्गशीर्ष अमावस्येच्या शुभ मुहूर्तावर करा गंगा स्नान, जाणून घ्या महत्व

SCROLL FOR NEXT