नागपूर

नागपूरकरांची चिंता मिटली! दमदार पावसामुळे जलसाठे तुडुंब

नरेंद्र चोरे

नागपूर : मागील तीन-चार दिवस दमदार पाऊस कोसळल्याने नागपूर जिल्हा व विदर्भातील धरणांच्या जलसाठ्यात बऱ्यापैकी वाढ झालेली आहे. नागपूर शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या तोतलाडोह, खिंडसी व कामठी खैरी जलाशयातही पुरेसा जलसाठा जमा झाल्याने गतवर्षीप्रमाणेच यंदाही नागपूरकरांना आगामी उन्हाळ्यात भरपूर पाणी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

जुलै महिन्यात अपेक्षेप्रमाणे कमी पाऊस पडल्याने व मधल्या काळात मोठा खंड पडल्याने नागपूर जिल्हा व विदर्भातील बहुतांश प्रकल्पांची स्थिती चिंताजनक होती. मात्र, ऑगस्ट महिन्यात आठ-नऊ दिवस चांगला पाऊस झाल्याने धरणांतील साठ्यात वाढ झाली आहे. विदर्भातील विविध मोठ्या, मध्यम व छोट्या धरणांमधील उपलब्ध जलसाठ्यांचा विचार केल्यास परिस्थिती आटोक्यात आहे.

सद्यस्थितीत नागपूर विभागातील १६ मोठ्या धरणांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत (७६ दशलक्ष घनमीटर) ५६ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा शिल्लक आहे. तर ४२ मध्यम प्रकल्पांमध्ये गतवर्षीपेक्षा (५८.३३ दशलक्ष घनमीटर) ३०.७४ दशलक्ष घनमीटर इतका साठा उपलब्ध आहे. ३२६ छोट्या प्रकल्पांची स्थिती थोडी चिंताजनक आहे. आजच्या तारखेला छोट्या प्रकल्पांमध्ये केवळ १६.२४ दशलक्ष घनमीटर जलसाठा आहे, जो गतवर्षी ५६.७९ दशलक्ष घनमीटरपेक्षा कमी आहे. नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या स्थितीत थोडीफार सुधारणा झाली आहे.

आजच्या घडीला पेंच नदीवरील तोतलाडोह जलाशयात ६४.१३ दशलक्ष घनमीटर जलसाठा शिल्लक असून, कामठी खैरी व खिंडसी जलाशयात अनुक्रमे ५६.६४ व ४०.४८ दशलक्ष घनमीटर जलसाठा उपलब्ध आहे. पावसाळा संपायला आणखी सव्वा महिना शिल्लक असल्याने व या आठवड्यात प्रादेशिक हवामान विभागाने जोरदार पावसाची शक्यता वर्तविल्याने धरणे काठोकाठ भरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे गतवर्षीप्रमाणे यंदाच्याही उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचे संकट टळणार, अशी चिन्हे दिसत आहे.

धरणातील जलसाठ्याची स्थिती (दशलक्ष घनमीटरमध्ये)

धरण आजचा साठा गतवर्षीची स्थिती

तोतलाडोह ६४.१३ ९५.०७

खिंडसी ४०.४८ ३७.९६

कामठी खैरी ५६.६४ ९४.७२

गोसेखुर्द ५५.७७ ५३.७५

इटियाडोह ३७.४५ ७२.१६

पुजारीटोला ५१.४३ ५२.७८

आसोलमेंढा ८६.८१ १००

बावनथडी ४३.७६ ६८.०९

बेंबळा ८६.७६ ९१.७३

खडकपूर्णा ३६.२८ ८१.००

काटेपूर्णा ९३.२३ ९१.४८

अप्परवर्धा ६९.४२ ९४.६९

लोअर वर्धा ७६.३४ ८६.८१

बोर ७४.४१ ८२.८१

दिना ३८.८१ ४६.४८

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT