टेकाडी (जि. नागपूर) : तालुक्यातील बखारी, वाघोडा इत्यादी वाळू घाटांवरून वाळूची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू आहे. वाघोली शिवारात मंगळवारी रात्री अवैध वाळू तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरचा अपघात होऊन २६ वर्षीय ट्रॅक्टर चालक प्रदीप ऊर्फ झामा रोशन नितनवरे याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी जखमी युवकाला त्याच्या मालकाने रुग्णालयात न नेता थेट त्याच्या आजोबांच्या घरी पोहचते केले. अर्धमेल्या अवस्थेतील मुलाला पाहून कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार केली. कन्हान पोलिसांनी पहाटे मृतदेह ताब्यात घेऊन अकस्मात मृत्यूची नोंद केली. तसेच बखारी शिवारातून अपघातग्रस्त ट्रॅक्टर ताब्यात घेतले. प्रदीपचा मृत्यू अकस्मिक नसून हा अपघात असल्याचे बोलले जाते. याशिवाय अवैध वाळू तस्करीसंदर्भात पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कन्हान पोलिस ठाण्यांतर्गत मोठ्या प्रमाणात अवैध वाळू आणि कोळशाच्या धंद्यांतील रकमेच्या मोबदल्यात वाटप झाले. अशाच एका रात्री अवैध व्यवसायात लिप्त आरोपीकडून चिरीमिरीच्या प्रकरणात पोलिस शिपायाला भर चौकात चाकूने भोसकून ठार करण्याचा प्रयत्न केला होता. तरी पोलिस स्टेशन हद्दीत राजरोसपणे अवैध वाळू तस्करी जोरात सुरू आहे. कन्हान नदी घाटांमधून रात्रभर वाळूचा उपसा करून ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाळू गावोगावी पोहोचवली जाते.
मंगळवारी रात्री मृत ट्रॅक्टर चालक प्रदीप ऊर्फ झामा रोशन नितनवरे (२६ ) रा. बोरडा (गणेशी) हा रात्री उशिरा अवैध वाळूचे भरलेले ट्रॅक्टर रिकामे करून पुन्हा ट्रॅक्टर भरण्यासाठी वाळू घाटाकडे निघाला होता. दरम्यान वाघोली शिवारात त्याचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले आणि त्याचा अपघात झाला. ट्रॅक्टर मालकासोबत त्याच्या इतर सहकाऱ्यांनी त्याला रुग्णालयात न नेता रात्री दीडच्या सुमारास घरी पोहचवून ट्रॅक्टरवरून पडल्याचे सांगितले.
प्रदीप कुठलीही हालचाल करीत नसल्याने त्याच्या घरच्यांनी शेजाऱ्यांना हाक दिली. गावातील पोलिस पाटलांनी कन्हान पोलिसांना माहिती दिली. कन्हान पोलिसांनी पहाटे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
प्रकरण दडपण्याचा प्रयत्न
मिळालेल्या माहितीनुसार, मृताचे वडील मध्यवर्ती कारागृहात एका प्रकरणात शिक्षा भोगत आहेत. तर आईचे निधन झाले आहे. मृत प्रदीप बहिणीसोबत बोरडा येथे आजोबाकडे राहत होता. प्रदीपच्या बहिणीचे लग्न जुळले आहे. प्रदीपच्या बहिणीच्या लग्नाचा संपूर्ण खर्च देण्याचे आमिष अवैध वाळू माफियांनी दिले असल्याची माहिती पुढे आली आहे.
संपादन : अतुल मांगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.