After meeting the sister, she returned and hit the bus 
नागपूर

बहिणीची भेट घेऊन परतले आणि बसला धक्‍का

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : सोन्याचे भाव गगनाला भिडत आहेत, प्रत्येकजण जिवापेक्षा सोने जपत आहे, अशातच बहिणीच्या भेटीला गेलेल्या भावाचे लाखोंचे सोनेच एकाने लांबवले. पाच मिनटात घडलेल्या या गुन्ह्याचा छडा पोलिसांनी चोवीस तासांच्या आत लावत आपली कर्तबगारी सिद्ध केली आहे. बहिणीच्या घरासमोरून भावाची लाखमोलाचे दागिने असलेली बॅग लांबविणाऱ्या चोरट्याला गुन्हे शाखेच्या पथकाने 24 तासांच्या आत हुडकून काढले. त्याच्याकडून चोरीचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे.

दिनेश गजानन तळेकर (32) रा. भांडे प्लाट, गवंडीपुरा, जुना सक्करदरा असे अटकेतील चोरट्याचे नाव आहे. दत्तात्रयनगर येथील रहिवासी मधुकर सवाई (59) हे सहपरिवार हरपूरनगर, भांडे प्लॉट येथे राहणाऱ्या बहिणीकडे गेले होते. बहिणीची भेट घेऊन रात्री 9 वाजताच्या सुमारास घराकडे परतण्यासाठी निघाले. त्यांच्याकडे 1 लाख 90 हजार रुपये किमतीचे दागिने व मोबाईल असलेली बॅग होती. ती बॅग गाडीला अडकवली. तेवढ्यातच बहिणीने आवाज दिल्याने ते परत घरात गेले. त्याच दरम्यान चोरट्याने गाडीच्या हॅन्डलला अडकवलेली बॅग लंपास केली.

चोरीची बाब लक्षात येताच सवाई यांनी सक्करदरा ठाणे गाठून तक्रार दिली. त्या आधारे पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. गुन्हे शाखेच्या पथकानेही समांतर तपास सुरू केला. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी दिनेशला ताब्यात घेतले. घराची झडती घेतली असता चोरलेल्या सोन्याच्या बांगड्या, मंगळसुत्र, चांदीचे आकडे, सोन्याचे डोरले, मणी आणि सोन्याचे कानातले आढळून आले. सोबतच काही गहाण पावत्याही होत्या. त्याबाबत विचारणा केली असता त्याने धनलक्ष्मी ज्वेलर्समध्ये काही दागिने गहाण ठेवल्याचे कबुल केले. त्याआधारे सराफा व्यवसायी अविनाश आसरे यांच्याकडून गहाण ठेवलेले दागिनेही जप्त केले. चोरट्याने लांबविलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.

जुन्या वैमनस्यातून राडा

जुन्या वैमनस्यातून लोखंडी रॉड व लाकडी दांड्याने मारहाण करीत एकाला गंभीर जखमी करण्यात आले. गुरुवारी रात्री पारडी हद्दीतील जय मॉं अंबेनगरात ही घटना घडली. महेश सेलोकर (40) रा. जय मॉं अंबेनगर असे जखमीचे नाव आहे. गुरुवारी रात्री ते पायीच घराजवळील पानठेल्यावर खर्रा घेण्यासाठी गेले होते. वस्तीतच राहणारा बंसी नावाच्या व्यक्तीसोबत त्यांचा वाद आहे. बंसीने आपल्या एका मित्रासह सेलोकर यांना एकटे गाठले. आरोपींनी मागून येऊन त्यांच्या डोक्‍यावर दगड हाणला. खाली पडताच लोखंडी रॉड आणि लाकडी दांड्याने डोक्‍यावर मारून गंभीर जखमी केले. याप्रकरणी सेलोकर यांच्या तक्रारीवरून पारडी पोलिसांनी गंभीर दुखापतीचा गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan East Assembly Election 2024 Result Live: कल्याण पूर्वमध्ये उद्धव ठाकरे गटाला धक्का; सुलभा गायकवाड यांचा दणदणीत विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: महाराष्ट्रानं मतदान केलंय की ईव्हीएम नं केलंय; आदित्य ठाकरेंचा सवाल

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले आघाडीवर

Santosh Bangar Won Kalmanuri Assembly Election 2024 Result : संतोष बांगर विजयी; डॉ. संतोष टारफे यांचा पराभव

Ulhasnagar Assembly Election 2024 Result Live: उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता; कुमार आयलानी यांचा विजय, ओमी कलानींना धक्का

SCROLL FOR NEXT