Devendra Fadnavis Sakal
नागपूर

Agro Vision : संत्रा निर्यातीला ५० टक्के अनुदान - देवेंद्र फडणवीस

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - जिल्ह्यासह विदर्भातील शेतकऱ्यांच्या संत्र्याची बांगलादेशमध्ये निर्यात होते. मात्र, बांगलादेशने आयात शुल्कावर कर लादल्याने संत्र्यांची निर्यात अचानक थांबली. यावर तोडगा काढण्याच्या प्रयत्नात राज्य शासन आहे. त्यासाठी संत्रा निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य शासनातर्फे ५० टक्के अनुदान प्रतिपूर्ती म्हणून देण्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

ॲग्रोव्हिजन फाउंडेशनतर्फे आयोजित ॲग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनाचा समारोपीय सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. दाभा येथील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या परिसरात आयोजित या कार्यक्रमाला ॲग्रोव्हिजनचे मुख्य प्रवर्तक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह

उत्तर प्रदेशचे कृषिमंत्री सूर्यप्रताप साही, अरुणाचल प्रदेशचे कृषिमंत्री टागे टाकी, वर्ध्याचे खासदार रामदास तडस, आर्वीचे आमदार दादाराव केचे, मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे, माजी खासदार विकास महात्मे, आमदार टेकचंद सावरकर, अ‍ॅग्रोव्हिजनचे संयोजक रवींद्र बोरटकर,  सल्लागार डॉ. सी. डी. मायी आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

शेतकऱ्यांना शेतमाल विकताना अडचणी येतात. दलालांना नफा जास्त मिळतो. शेतकऱ्यांपुढे असलेल्या या सर्व अडचणी लक्षात घेत राज्य शासन त्या दूर करण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले. ते म्हणाले, वातावरणातील बदलामुळे शेतीसमोर अनेक आव्हाने उभी आहेत.

रसायनांमुळे, आपल्या जमिनीची क्षमता हळूहळू कमी होत आहे. त्यावर उपाय म्हणून राज्य शासनाने नैसर्गिक शेतीवर भर देण्यासाठी अभियान हाती घेतले आहे. यासाठी राज्यातील ३५ लाख हेक्टर शेती तीन वर्षात नैसर्गिक शेतीमध्ये रूपांतर करण्याचा मानस आहे, असेही फडणवीस यांनी नमूद केले.

टागे टाकी म्हणाले, आम्ही हिमालयात राहत असूनही तुम्हा महाराष्ट्रीय लोकांच्या खूप जवळ आहोत. कारण, हिमालयात विकास करण्यासाठी तुमच्या गोष्टी खूप महत्त्वपूर्ण ठरतात. गडकरींच्या मार्गदर्शनामुळेच अरुणाचल प्रदेशमध्ये दळणवळण, आधुनिक शिक्षण अशा अनेक सुविधा उपलब्ध झाल्याचे त्यांनी नमूद केले. सूर्यप्रताप साही म्हणाले, उत्तर प्रदेशमध्ये गंगा-जमुना सारख्या मोठ-मोठ्या नद्या असूनही राज्याचा विकास होऊ शकला नव्हता.

गडकरींच्या सानिध्यात जेव्हा जेव्हा आलो तेव्हा त्यांचे मार्गदर्शन मिळत गेले. ते नेहमी विकासाबाबत मला सल्ले देतात आणि आम्ही त्यातून अनेक गोष्टी शिकलो, असेही ते म्हणाले. आयोजन समितीचे रवी बोरटकर यांनी प्रस्ताविक केले. संचालन रेणुका देशकर यांनी केले.

भविष्यात कोळशाला पर्याय बांबू

यंदाचे हे पहिले ॲग्रोव्हिजन आहे जिथे बांबू पासून पांढरा कोळसा तयार करून कोळशाला पर्याय देण्याचा प्रयत्न होत आहे. वर्ध्याच्या एमगिरीने हे तंत्रज्ञान तयार केले आहे. याची क्लोरिफिक व्हॅल्यू ४ हजार पर्यंत जाते. हा प्रयोग पर्याय म्हणून उपयुक्त ठरल्यास २५ लाख कोटी रुपयांचा बांबू आपण विकू शकणार आहोत. जेणेकरून, लाखो शेतकऱ्यांचे जीवन बदलू शकेल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात आपण उसाच्या भावाने बांबूची खरेदी करू, असेही ते यावेळी म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tingare To Sharad Pawar: 'दिवटया आमदार' म्हणत शरद पवारांची बोचरी टीका; सुनील टिंगरे म्हणाले, मी त्यांना...

खासदार महाडिकांच्या सुपुत्राची राजकारणात होणार एन्ट्री? कृष्णराज म्हणाले, 'पक्षाने संधी दिली तर निवडणूक लढवणार'

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात आज पुन्हा कोसळणार मुसळधार पाऊस! 'या' जिल्ह्यांना हवामान विभागाचा इशारा

Devendra Fadnavis: उपमुख्यमंत्री दालनाबाहेर तोडफोड करणारी 'ती' महिला आहे तरी कोण?

Latest Maharashtra News Updates : केंद्रीय यंत्रणांकडून अलर्ट आल्यानंतर मुंबई पोलीस सतर्क

SCROLL FOR NEXT