Corona Test Sakal
नागपूर

Corona Test : विमान प्रवाशांचा थर्मल स्क्रिनिंग चाचणीला विरोध

केंद्र सरकारच्या आदेशानुसार महापालिकेने विमानतळावर विदेशातून येणाऱ्या प्रवाशांची चाचणी करण्यास सुरुवात केली.

सकाळ वृत्तसेवा

केंद्र सरकारच्या आदेशानुसार महापालिकेने विमानतळावर विदेशातून येणाऱ्या प्रवाशांची चाचणी करण्यास सुरुवात केली.

नागपूर - केंद्र सरकारच्या आदेशानुसार महापालिकेने विमानतळावर विदेशातून येणाऱ्या प्रवाशांची चाचणी करण्यास सुरुवात केली. शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजता विमानतळावर प्रवाशांनी कोरोना चाचणी करण्यास नकार दिला. त्यामुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना नमते घ्यावे लागते. केवळ एका प्रवाशाची चाचणी करण्यात आली असून त्याचा अहवाल निगेटिव्ह आला.

केंद्र शासनाच्या आदेशानुसार महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी शुक्रवारी बैठक घेऊन शहरात विदेशातून दाखल होणाऱ्या प्रवाशांची विमानतळावर चाचणी करण्याचे निर्देश दिले होते. शुक्रवारी मध्यरात्री दोहावरून नागपुरात विमान आले. यात शेकडो प्रवासी होते.

महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारीही मध्यरात्री चाचणीसाठी तयार होते. विमान येताच महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी विमानतळ अधिकाऱ्यांच्या सहकार्याने कोरोना चाचणीसाठी पुढाकार घेतला. परंतु रात्रीच्या वेळी प्रवाशांनी चाचणी करण्यास नकार दिला. चाचणीची ट्रायल असल्याने मनपा कर्मचाऱ्यांनीही नमते घेतले. परंतु एका प्रवाशाची चाचणी करण्यात आली. हा प्रवाश्याचा अहवाल निगेटिव्ह आला. रात्री दोन वाजताही विमान येणार असून चाचणी करण्यात येणार आहे. शहरात बुधवारी रात्रीचा अपवाद सोडला तर दोहा आणि शारजा येथून दर आठवड्याला सहा विमाने येतात. त्यामुळे महापालिका दररोज रात्री दोहा व शारजा येथून येणाऱ्या विमानातील प्रवाशाची चाचणी करणार आहे.

झोननिहाय चाचणी केंद्र

  • लक्ष्मीनगर झोन - आरपीटीएस मुख्यालय, जेरील लॉन जवळ, जयताळा यूपीएचसी, जयताळा, खामला यूपीएचसी, खामला, कामगारनगर यूपीएचसी, कामगार कॉलनी, सुभाषनगर.

  • धरमपेठ झोन - तेलंगखेडी यूपीएचसी, सुदामनगरी, हजारी पहाड यूपीएचसी, सदर रोग निदान केंद्र, फुटाळा यूपीएचसी, अमरावती रोड, गल्ली क्रमांक ३

  • हनुमाननगर झोन - हुडकेश्वर यूपीएचसी, नासरे सभागृहजवळ, मानेवाडा यूपीएचसी, व्हॉलिबॉल मैदान, शाहुनगर, नरसाळा यूपीएचसी.

  • धंतोली झोन - कॉटन मार्केट यूपीएचसी, बाबुलखेडा यूपीएचसी, मानवता हायस्कूलजवळ.

  • नेहरूनगर झोन - नंदनवन यूपीएचसी, दर्शन कॉलनी, बिडीपेठ यूपीएचसी, त्रिकोणी मैदान, ताजबाग यूपीएचसी, मोठा ताजबाग, दिघोरी यूपीएचसी, जिजामातानगर.

  • गांधीबाग झोन - मोमिनपूरा यूपीएचसी, स्व. प्रभाकरराव दटके महाल रोग निदान केंद्र, भालदारपुरा यूपीएचसी, उर्दू स्कूल गंजीपेठ, नेताजी रोग निदान केंद्र, गोळीबार चौक.

  • सतरंजीपुरा झोन - शांतीनगर यूपीएचसी, मुदलीयार चौक, मेहंदीबाग यूपीएचसी, कुंदनलाल गुप्तानगर हेल्थ पोस्ट, पंचवटीनगर मैदान, जगनाथ बुधवारी यूपीएचसी, गोळीबार चौक रोड.

  • लकडगंज झोन - पारडी यूपीएचसी, सुभाष मंदिर, डिप्टी सिग्नल यूपीएचसी, संजयनगर शाळेजवळ, हिवरीनगर यूपीएचसी, पॉवर हाउसजवळ, बाबुळबन यूपीएचसी, गरोबा मैदान, भरतवाडा युपीएचसी, विजयनगर.

  • आशीनगर झोन - शेंडेनगर यूपीएचसी, पाचपावली यूपीएचसी, लष्करीबाग मराठी प्राथ. शाळा, बंदे नवाज यूपीएचसी, फारूकनगर, टेका, गरीब नवाज यूपीएचसी, गरीब नवाजनगर.

  • मंगळवारी झोन - गोरेवाडा यूपीएचसी, संविधान भवन, गोरेवाडा, इंदोरा यूपीएचसी, बेझनबाग, जरीपटका रोग निदान केंद्र, नारा यूपीएचसी.

नागरिकांसाठी ३९ लसीकरण केंद्र

शहरातील नागरिकांच्या चाचणीसाठी मनपाने ३९ चाचणी केंद्र पुन्हा सुरू केले. सोबतच लसीकरणावरही भर देण्यात येत आहे. शहरात आतापर्यंत कोव्हिड प्रतिबंधात्मक लसीकरणाचे एकूण ४३ लाख ८५ हजार ३६४ डोस पूर्ण झालेले आहेत. यापैकी अनेक जण अद्यापही बूस्टर डोसपासून वंचित आहेत. कोरोना संबंधी लक्षणे आढळल्यास नागरिकांनी जवळच्या कोविड चाचणी केंद्रातून नि:शुल्क चाचणी करून घ्यावे, असे आवाहन मनपाने केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : राहुल गांधी आणि नाना पटोले प्रचाराचा नारळ फोडणार

SCROLL FOR NEXT