मुंबई- राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजीत पवार त्यांच्या सोबत उद्योग मंत्री उदय सामंत आणि पार्थ पवार नागपूर ते गडचिरोली हेलिकॅाप्टर प्रवासात सूदैवाने बचावले आहेत. खराब हवामानामुळे हेलिकॅाप्टर पावसाळी ढगात भरकटले होते. खराब हवामानामुळे दृष्यमानता अत्यंत कमी झाली होती. हेलिकॅाप्टर पायलटने मोठ्या कौशल्याने हेलिकॅाप्टर जमीनीवर उतरवले. त्यामुळे पुढील मोठी दूर्घटना टळली.
चार महत्त्वाचे नेते या हेलिकॉप्टरमध्ये होते. त्यावेळी हेलिकॉप्टर भरकटले होते. गडचिरोलीत खराब हवामानाचा फटका त्यांना बसला होता. पण, सुदैवाने सर्वजण सुखरुप आहेत. हेलिकॉप्टर पायलटने यावेळी आपलं कौशल्य दाखवल्याचं सांगितलं जातं. त्याने सुखरूप हेलिकॉप्टर जमिनीवर उतरवलं, असं साम टीव्हीच्या वृत्तात सांगण्यात आलं आहे.
अजित पवारांनीच हा किस्सा आज सांगितला आहे. हेलिकॉप्टर व्यवस्थित उडालं, पण ते नंतर भरकटलं. हेलिकॉप्टर ढगात गेलं होतं. पण, देवेंद्र फडणवीस निवांत गप्पा मारत होते, असं अजित पवार म्हणाले आहेत. सुदैवाने पायलटने कौशल्य दाखवत हेलिकॉप्टर जमिनीवर उतरवलं. त्यानंतर दोन्ही उपमुख्ममंत्र्यांनी गडचिरोलीच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
अजित पवार म्हणाले की, सुरुवातील बरं वाटलं, पण इकडे ढग, तिकडे ढग दिसत होतं. मी फडणवीसांना म्हटलं जरा बाहेर बघा. पण, ते म्हणाले काही काळजी करू नका. आतापर्यंत माझे सहा असे अपघात झाले आहेत. अशा अपघातामध्ये मला काही झालेलं नाही. त्यामुळे तुम्हाला देखील काही होणार नाही. तुम्ही निवांत राहा.
मी काळजीत पडतो होतो. पण, फडणवीस निवांत होतं. मागची पुण्याई असेल. त्यामुळेच ते इथपर्यंत पोहोचले आहेत. उदय सामंत देखील आमच्यासोबत होते. ते म्हणाले दादा जमीन दिसायला लागली, तेव्हा कुठे माझा जीव भांड्यात पडला, असं अजित पवार म्हणाले. अजित पवार कार्यक्रमात बोलताना हा किस्सा सांगत होतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.