Government Medical College, Akola: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाद्वारे संचालित सर्वोपचार रुग्णालयातील जेवणात अळ्या निघाल्याचा प्रकार शुक्रवारी (ता. २९) समोर आला. या प्रकारानंतर रुग्णालयात खळबळ उडाली.
या प्रकराची माहिती मिळताच मनसेचे पदाधिकारी यांनी सर्वोपचार रुग्णालय गाठून अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांच्यासोबत चर्चा केली. दरम्यान या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश डा. गजभिये यांनी दिले आहेत.
सर्वोपचार रुग्णालयात उगवा येथील रहिवाशी रुग्ण उकर्डा बळीराम मेहरे हे वार्ड क्रमांक ३१ मध्ये उपचारार्थ भरती आहे. त्यांनी २९ डिसेंबर रोजी १२ वाजता सर्वोपचार मधील जेवण घेतले असता त्यामध्ये अळ्या व किडे दिसून आले. त्यामुळे त्यांनी याबाबत उपस्थितांना माहिती दिली असता रुग्णालयात खळबळ उडाली. (Latest Marathi News)
दरम्यान या प्रकाराची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेश काळे, महिला जिल्हाध्यक्ष प्रशंसा अंबेरे यांना मिळताच त्यांनी याबाबत सर्वोपचार रुग्णालयात घाव घेतली व अधिष्ठातांसोबत चर्चा केली. यावेळी मनसेचे इतर पदाधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती.
रुग्णाच्या जेवणात निघालेल्या अळ्या सर्वोपचार रुग्णालयात नाहीत. जेवनात अळ्या कोठून आल्या याबाबतची चौकशी करण्यात येत आहे.- डॉ. मीनाक्षी गजभिये
अधिष्ठाता, जीएमसी, अकोला(Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.