Akola Suspicious Death Proved Murder: तालुक्यातील सिरसो गायरान मधील पोल्ट्री फार्म जवळ १६ फेब्रुवारीच्या रात्री दरम्यान ५० वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आला. सदर प्रकरणी आत्महत्या की हत्या, या चर्चेला पूर्णविराम लागला असून प्राथमिक शवविच्छेदन अहवालावरून सदर इसमाच्या डोक्यावर मारहान करुन त्यास पेटवून दिल्याच्या अहवालावरून अज्ञात मारेकऱ्या विरूध्द ग्रामीण पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी सैय्यद जाबिर सैय्यद जमीर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे जावई सैय्यद सलीम सैय्यद मुस्ताक (वय ५०, रा. बालाजी चौक, मूर्तिजापूर) हे १६ फेब्रुवारी रोजी घरुन सायंकाळी काही न सांगता निघून गेले. त्याचा शोध घेत असता त्याचा मृतदेह सिरसो गायरण हिरपूर रोडवर असलेल्या शेतात अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आला. याबाबतची माहिती ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेंद्र राऊत, एएसआय दीपक कानडे, हेड पोलिस कॉन्स्टेबल रडके यांना मिळाल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी पंचनामा करून आपत्कालीन पथकाच्या मदतीने अर्धवट जळलेल्या मृतदेह स्थानिक लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी ठरविले. परंतु मृतक याच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केल्याने शवविच्छेदन मूर्तिजापूर येथे न करता अकोला येथील सर्वोपचार रूग्णालयात करण्यात आले. (Latest Marathi news )
इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. जळलेल्या इसमाचा अंतिम विधी उरकल्यानंतर मृतकाचा मुलगा सैय्यद मुक्तार सैय्यद सलीम (वय २०) याने दिलेल्या फिर्यादीनुसार या प्रकरणी अज्ञात मारेकऱ्याविरूध्द ग्रामीण पोलिस ठाण्यात कलम ३०२, २०१ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचा तपास ठाणेदार सुरेंद्र राऊत करीत आहेत.
पोलीस अधीक्षकांसह ताफा घटनास्थळी
घटनेचे गांभीर्य पाहता जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चनसिंह, उपजिल्हा पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे, एलसीबीचे पोलिस निरीक्षक शंकर शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक भगत, ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेंद्र राऊत, गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक, आयकार युनिट, श्वान पथक व इतरांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलीस निरीक्षक सुरेंद्र राऊत यांना जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चनसिंह यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. (Latest Marathi news )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.