Amit Shaha sakal
नागपूर

Assembly Elections : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर; विदर्भातील भाजप पदाधिकाऱ्यांसोबत साधणार संवाद

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा विदर्भासह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांचा हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. महायुतीत जागावाटपाच्या चर्चेला वेग आला आहे. अमित शहा २४ आणि २५ सप्टेंबरला नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि कोल्हापूर दौऱ्यावर असणार आहेत. यात ते भाजप नेत्यांकडून स्थितीचा आढावा घेतील.

शहा यांच्या उपस्थितीत सकाळी ११ वाजता २४ सप्टेंबरला रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात विदर्भातील आमदार, खासदार, माजी आमदार, खासदार, तालुका अध्यक्षापासून सर्वच भाजप पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार आहेत. संभाजीनगर येथे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांसोबत अमित शहा जागावाटपावर चर्चा करतील. त्यानंतर जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर कधी करायचा याचा निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

भाजपची १५५ जागांची मागणी

भाजपकडून १५५ ते १६० जागांची मागणी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला १३३ जागा उरतील. अशा स्थितीत शिवसेनेला १०० जागांची अपेक्षा आहे तर अजित पवार यांची भूमिका ६० पेक्षा कमी जागा नको अशी असल्याचे समजते. त्यामुळे महायुतीमध्ये जागा वाटपावरून चांगलीच रस्सीखेच सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यावर तोडगा काढण्यासाठी शहा यांच्यासोबत चर्चा होणार आहे. कारण लोकसभेच्यावेळी उशिरापर्यंत उमेदवार जाहीर न झाल्याने त्याचा फटका निवडणुकीत बसल्याचे तिन्ही पक्षांचे नेते मान्य करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharavi: 5 हजार जणांचा जमाव; भडकाऊ पोस्ट व्हायरल अन् गर्दीत बाहेरचे लोक, धारावी मशीद प्रकरणी पोलिसांचा मोठा खुलासा

Satyapal Malik: "अंबानींची फाईल माझ्याकडं सहीसाठी आली होती, पण..."; सत्यपाल मलिकांचा खळबळजनक खुलासा

...नाहीतर हातपाय तोडू, पाकिस्तानी चित्रपट 'द लिजेंड ऑफ मौला जट' विरोधात MNS आक्रमक, थेट धमकीच दिली

Dharavi Mosque: धारावी मशीद प्रकरण; बेकायदा बांधकाम हटवण्यासाठी समितीला 8 दिवसांची मुदत, अन्यथा...

Zero to hero! शुभमन गिलने भारी पराक्रम नोंदवला, आपला Rishabh Pant ही विक्रमाच्या बाबतीत मागे नाही राहिला

SCROLL FOR NEXT