amit saha  sakal
नागपूर

Amit Shah : पवार, ठाकरेंची अमित शाह यांना धास्ती; विधानसभा जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांना काय दिला कानमंत्र?

assembly elections 2024 : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजप कार्यकर्त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत १०% मते वाढवण्याचे आवाहन केले आहे. विदर्भातील किमान ४५ जागा जिंकण्याच्या उद्दिष्टाने महायुती एकत्र लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : ‘‘केंद्रात आपलीच सत्ता आणि पंतप्रधानही आपलेच आहेत. विजयासाठी फक्त दहा टक्के अधिक मते हवी आहेत. ही दहा टक्के मते वाढल्यास आपला विजय निश्चित आहे,’’ असे म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विजयाचे सूत्रच भाजप कार्यकर्त्यांना सांगितले.

तसेच, महायुती आगामी विधानसभा निवडणूक एकत्रितच लढणार असल्याचेही सूतोवाच केले. सत्ता हवी असल्यास विदर्भातील किमान ४५ जागा जिंकायला हव्यात, असे सांगताना त्यांनी कार्यकर्त्यांना आणि नेत्यांनाही कामाला लागण्याचे आदेश दिले.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहा हे राज्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. दिल्लीहून नागपूरमध्ये दाखल होत त्यांनी आज पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. विधानसभा निवडणुकीत भाजपचाच विजय होईल, असा विश्‍वास शहा यांनी यावेळी व्यक्त करत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला.

ते म्हणाले,‘‘लोकसभा निवडणुकीत अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्या असल्या तरी चिंता करण्याचे कारण नाही. राज्यात पुन्हा आपलेच सरकार येणार यावर विश्‍वास ठेवा. निवडणूक जिंकण्यासाठी नुसता जोश नको तर होशही आवश्यक आहे. विदर्भात यापूर्वी भाजपने ४२ जागा जिंकल्या होत्या.

विदर्भात जिंकल्याशिवाय राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होऊ शकत नाही हे लक्षात ठेवा. त्यामुळे महायुतीमध्ये उमेदवार कोणाचा हा ‘किंतु-परंतु’ मनातून काढून टाका. महायुतीच्या उमेदवाराला भाजपचा उमेदवार समजा. आपले लक्ष्य काँग्रेस, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना रोखण्याचे आहे.

मते वाढवा, विजय आपलाच

लोकसभेच्या निवडणुकीनंतर भाजपने बुथनिहाय नियोजन केले आहेत. त्याची ए-बी-सी अशी श्रेणी केली आहे. त्या सर्व बुथवर १० टक्के मते वाढवल्यास भाजपला कोणी पराभूत करू शकणार नाही.’’ राज्याच्या सत्तेच्या किल्ल्या विदर्भाकडे असल्याने येथील ६२ जागांपैकी किमान ४५ जागा तरी जिंकाव्याच लागतील, असेही ते म्हणाले.

रेशीमबागेतील सुरेश भट सभागृहात झालेल्या या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह आजी-माजी खासदार, आमदार, पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. माध्यमांना संघटनात्मक बैठकीपासून दूर ठेवले गेले.

जागांचा घेतला आढावा

अमित शहा यांनी विधानसभेच्या पूर्व व पश्चिम विदर्भातील ६२ जागांचा आढावा घेतला. नागपूरनंतर ते छ्त्रपती संभाजीनगर, नाशिक व मुंबईत जागांचा आढावा घेतील. महायुतीच्या जागा वाटपाचा फॉम्युला लवकरच अंतिम होणार असल्याचे समजते.

कार्यकर्त्यांना सूचना

लाभार्थींच्या घरी जा, बुथ बैठकांना सुरुवात करा, आपसातील मतभेद दूर सारा, शेतकऱ्यांचे आशीर्वाद घ्या, विजयादशमी ते दीपावलीदरम्यान भाजपचा झेंडा हाती घेऊन स्कूटर रॅली काढा, महापालिका, जिल्हा परिषद, ग्राम पंचायतीतील पराभूतांसोबत संपर्क साधा, विरोधकांच्या बुथ कमिटी सदस्यांनाही आपल्याकडे वळवा, व्हॉट्‌सॲप ग्रुप स्थापन करा

सामूहिक नेतृत्वाखाली निवडणूक

राज्यातील निवडणूक कोणत्या एका नेत्याच्या नेतृत्वाखाली न लढता सामूहिक नेतृत्व असेल, असे सूतोवाच भाजपने आज दिले. ‘एकच लक्ष्य विधानसभा जिंका’ असे पत्रही पदाधिकारी, कार्यकर्त्यांना यावेळी देण्यात आले. त्यावर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, फडणवीस, बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढली जाईल, असे समजते. सामूहिक नेतृत्वाची चर्चा होत असतानाच नितीन गडकरी मात्र पूर्वनियोजित जम्मू काश्मीर दौऱ्यामुळे आजच्या बैठकीला उपस्थित नव्हते. त्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली होती.

गटबाजी नको

‘‘आपसातील भांडणे, हेव्यादाव्यांमुळे आपले काही भले होणार नाही. आपले लक्ष्य महाविकास आघाडीला सत्तेपासून रोखणे आणि महायुतीचे सरकार राज्यात स्थापन करण्याचे आहे. सर्वांना तिकीट देता येणार नाही. माझेही तिकीट एकेकाळी कापण्यात आले होते. त्यामुळे तुमचे दुःख मी समजू शकतो. शेवटी पक्ष महत्त्वाचा असतो. त्यामुळे राजी-नाराजी, मतभेदांपासून दूर राहा,’’ असा सल्ला अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना दिला.

शहांचे कार्यकर्त्यांना आवाहन

  • महायुतीतील प्रत्येक उमेदवाराच्या विजयासाठी प्रयत्न करा

  • शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना रोखणे आवश्‍यक

  • काँग्रेसला पराभूत करणे, हेच लक्ष्य

  • विदर्भात जास्तीत जास्त जागा निवडून आणा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah : राज्यात १६० पेक्षा जास्त जागांवर महायुतीचा विजय निश्चित..! : अमित शाह

Yogi Adityanath : काँग्रेसमध्ये इंग्रजांचे ‘जिन्स’, पक्षाकडून जात, भाषेवरून देशात फूट : योगी आदित्यनाथ

Women’s Asian Champions Trophy: गतविजेत्या भारतीय महिला संघाचे घवघवीत यश; जपानवर मात करत गाठलं अव्वल स्थान

Priyanka Gandhi : भाजप सरकारचा महाराष्ट्राशी भेदभाव! प्रियांका गांधी यांचे गडचिरोलीतील सभेत टीकास्त्र

मतदान कर्मचाऱ्यांना यंदा भत्ता मिळणार ऑनलाईन! ट्रायल पेमेंटसाठी आज 1 रुपया पाठवला जाईल; बॅंक खात्यांची होईल खात्री अन्‌ बुधवारपासून उर्वरित रक्कम मिळणार

SCROLL FOR NEXT