नागपूर

अमरावती नाव दुर्घटना : गुरुवारी सापडले सात मृतदेह; एकाचा शोध सुरू

अतुल दंढारे

मेंढला (जि. नागपूर) : अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील श्रीक्षेत्र झुंज येथे वर्धा नदीच्या पात्रात बोट उलटून ११ जण बुडाल्याची घटना मंगळवारी (ता. १४) सकाळी घडली होती. यापैकी तिघांचे मृतदेह त्याच दिवशी सापडले होते. तर दोन दिवसांनी म्हणजे गुरुवारी (ता. १६) सकाळी आणखी सात जणांचे मृतदेह सापडले. जागेवरच मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याचे आदेश एसडीएम नितीनकुमार हिंगोले यांनी दिले.

एनडीआरएफ, एसडीआरएफ व आपत्ती व्यवस्थापन कमांडो यांनी युद्धपातळीवर केलेल्या शोधानंतर गुरुवारी घटनास्थळापासून पाच किलोमीटर अंतरावर वेगवेगळ्या ठिकाणी मृतदेह सापडल्याची माहिती हिंगोले यांनी दिली. निशा मटरे, पीयूष मटरे, अतुल वाघमारे, ऋषाली वाघमारे, अश्विनी खंडागळे व पूनम शिवणकर अशी मृतदेह सापडलेल्यांची नावे आहेत. एकाचा मृतदेह लवकरच मिळेल, असे हिंगोले म्हणाले.

बुधवारी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी शोध व बचाव पथकाने कार्य तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. जिल्हा शोध व बचाव पथक, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल तसेच राज्य आपत्ती निवारण दलाची पथके कालपासून शोधकार्य करीत होती. पोलिस अधिकारी मिलिंद सरकटे वरुडचे ठाणेदार प्रदीप चोगावकर, तहसीलदार नंदकीशोर घोडेस्वार, ग्रामसेवक, तलाठी एस. के. गोलवाल, मासेमार तसेच मत्स्य विभागाचे अधिकारी मदतकार्य करीत होते.

एकाचा शोध सुरू आज सकाळी सापडलेल्या सातही मृतदेहाचे शवविच्छेदन घटनास्थळी करून नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रमोद पोतदार यांनी शवविच्छेदन केले. यानंतर शासकीय रुग्णवाहिकेतून मृतदेह त्यांच्या घरी पाठविण्यात आले. तर एका मृतदेहाचा अद्याप शोध सुरू आहे.

आतापर्यंत सापडलेल्या मृतांची नावे

पीयूष तुळशीदास मटरे, अश्विनी अमर खंडाळे, वृषाली अतुल वाघमारे, निशा नारायण मटरे, अतुल गणेश वाघमारे, नारायण भोमाजी मटरे, किरण विजय खंडाळे, वंशिका प्रदीप शिवणकर, पूनम प्रदीप शिवणकर व आदिती सुखदेव खंडाळे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi In Dhule: मविआच्या गाडीला ना चाक ना ब्रेक; तरीही चालकाच्या सीटवर बसण्यासाठी वाद, नरेंद्र मोदींचा घणाघात

Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे 1.43 लाख गुंतवणूकदारांचे पैसे बुडणार; काय आहे प्रकरण?

तीन मैत्रिणींच्या गुलाबी प्रवासाची गोष्ट येणार प्रेक्षकांच्या भेटीस ; ट्रेलरने घातली प्रेक्षकांना भुरळ

AUS vs PAK 2nd ODI: DRS घेऊ का? मोहम्मद रिझवानचा प्रश्न अन् Adam Zampa ने अख्ख्या पाकिस्तान संघाचा केला 'पोपट', Video

Latest Maharashtra News Updates : महायुती आहे तर गती आहे - मोदी

SCROLL FOR NEXT