नागपूर : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी एफआयआर न पाहता आरोप केले. अशी भाषा फक्त राणाच वापरत आहे, अशी प्रतिक्रिया पोलिस आयुक्त आरती सिंह यांनी दिली आहे. अमरावतीच्या खासदाराने पोलिस आयुक्तांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून प्रकरण दडपल्याचा आरोप केला होता. यानंतर आरती सिंह यांनी ही प्रतिक्रिया दिली.
असा आरोप फक्त खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी केला आहे. दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीने असा आरोप केलेला नाही. आमच्या मॅडम पोलिस खात्यात कोणाशीही बोलल्या नाही. बोलले नाही तर एफआयआरमध्ये कोणती कलमे लावली आहेत हे तरी बघायला हवे होते. चोरी किंवा दरोडेची बाब पोलिसांनी प्रेस नोटमध्येही नमूद केलेली नाही, असेही एका वृत्त वाहिनीशी बोलताना आयुक्त सिंह म्हणाल्या.
आम्ही चोरी किंवा दरोड्याची प्रेसनोट दिलेली नाही. तसेच अशी कलमेही लावलेली नाहीत. हे बिनबुडाचे आरोप एकाच ठिकाणाहून होत आहेत. प्रकरण दडपायचे असते तर चोरी व दरोडा यासारखी कलमे लावून ते दडपले असते किंवा आरोपी पकडले नसते. आम्ही आधी दोन आरोपी पकडले. नंतर चार पकडले. नंतर मुख्य आरोपीला पकडले. असे सात आरोपी पकडले गेले, असेही पोलिस आयुक्त आरती सिंह म्हणाल्या.
नवनीत राणांनी केले होते हे आरोप
पोलिस आयुक्त आरती सिंह प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत आहे. १२ दिवसांनी त्या प्रकरणावर स्पष्टीकरण देत आहे. त्यांनी आधी दरोडा असल्याचे सांगून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला होता. अमरावती पोलिस आयुक्तांची चौकशी झाली पाहिजे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना या घटनेबाबत पत्र लिहिले आहे, असे खासदार नवनीत राणा (Navneet Rana) म्हणाल्या होत्या. यानंतर एनआयएने कारवाई केली.
उमेश कोल्हेंचा २१ जून रोजी खून
केमिस्ट व्यावसायिक उमेश कोल्हे (५४) यांची २१ जून रोजी गळा चिरून खून (Murder) करण्यात आला होता. विशेष म्हणजे ही घटना राजस्थानच्या उदयपूर हत्याकांडाच्या एक आठवडा आधी घडली होती. सध्या एनआयए या प्रकरणाचा तपास करीत आहे. भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांच्या वक्तव्याच्या समर्थनात पोस्ट केल्याने कोल्हे यांचा खून करण्यात आला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.