चंद्रभागा नदी sakal
नागपूर

Amravati : विदर्भातील पहिलाच प्रयोग; नद्या वाचविण्याच्या हालचाली

चंद्रभागा नदीचे शंभरावर डोह उपसणार

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : नद्या जिवंत करण्याच्या दृष्टीने व्यापक प्रमाणात हालचाली सुरू झाल्या असून अमरावती जिल्ह्यातील चंद्रभागा नदीपात्रात असलेले शंभरावर डोह उपसण्याच्या नव्या प्रयोगाला लवकरच सुरवात होणार आहे. डोह उपसण्याची ही प्रक्रिया विदर्भात पहिल्यांदाच करण्यात येत असल्याने त्याबाबतची उत्सुकता ताणल्या गेली आहे.

नद्यांमधील डोहाला ‘हंगर झोन‘ अशी उपमा सुद्धा दिल्या जाते. नदीच्या प्रवाहासोबत येणारी प्रत्येक गोष्ट गडप करण्याची क्षमता या डोहांमध्ये असल्याने त्याला हे नाव देण्यात आले आहे. या डोहांमध्ये शेतातील काळी माती तसेच प्लॅस्टिक व अन्य कचरा अडकल्याने डोह चोक झाले असून त्यामुळेच थोडा पाऊस पडला तरी गावात पूर शिरतो,

असे निष्कर्ष अभ्यासाअंती काढण्यात आले आहेत. त्यामुळे नद्या जिवंत करण्याच्या प्रक्रियेत डोह उपसणे व त्याच्या माध्यमातून जमिनीला रिचार्ज करण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. नद्यांचे पुनरुज्जीवन करण्याच्या दृष्टीने शासनाने हाती घेतलेल्या ‘चला जाणुया नदीला‘ या अभियाना अंतर्गत ‘नदी संवाद यात्रा‘ सुरू करण्यात आली आहे.

सध्या अमरावती जिल्ह्यातील चंद्रभागा तसेच खोलाड या नद्यांची परिक्रमा सुरू आहे. या परीक्रमेत नदी प्रदूषित होण्याची कारणे तसेच विविध विषयांवर अभ्यास करण्यात येत आहे. अमरावतीचे जलतज्ज्ञ अरविंद नळकांडे सुद्धा या समितीत आहेत.

या आहेत उपाययोजना

  • नदीच्या पात्रातील डोह उपसणे.

  • नद्यांचे खोलीकरण करणे.

  • शेताची माती नदीत जाऊ न देणे.

  • नदी नैसर्गिक ठेवणे.

  • नदीकाठावर बांबूची लागवड करणे.

  • नदीच्या पात्रात सांडपाणी जाऊ न देणे.

पावसाचे पाणी नदीतून प्रवाहित होत असताना ते डोहात जाते. डोहातून भूगर्भात जाणारा पाण्याचा नैसर्गिक मार्ग असतो. त्यामुळे भूगर्भात चारही बाजूने हे पाणी झिरपत जाते. कितीही पाणी आले तरी ते गिळंकृत करण्याची क्षमता डोहात असल्यानेच नदीकाठच्या गावात पुराचे पाणी शिरत नाही. नदीपासून कितीतरी किलोमीटरच्या परिसरात डोहाचे पाणी जात असल्याने तेथील भूगर्भात पाण्याचे प्रमाण मुबलक राहण्यास मदत होते. मात्र हे डोह बुजल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळेच डोह उपसण्यात येणार आहेत.

- अरविंद नळकांडे, जलतज्ज्ञ, अमरावती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT