नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मागे लागलेले ग्रहण काही केल्या सुटत नसल्याचे दिसत आहे. त्यांच्या मागे ईडीचा पीडा लागलेला आहे. कोणत्या ना कोणत्या कारणाने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाते. शुक्रवारी (ता. ६) पुन्हा त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. नागपूर जिल्ह्यात असलेल्या नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेजवर ईडीने छापा टाकला.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल आणि वडविहिरा येथील निवासस्थानी ईडीने छापा टाकला होता. नागपूर जिल्ह्याच्या काटोल आणि नरखेड तालुक्यातील वडविहिरा येथे देशमुख यांचे वडिलोपार्जित घर आहे. या ठिकाणी ईडीच्या अधिकाऱ्यांची छापा टाकला होता. १६ जुलै रोजी ईडीने अनिल देशमुख यांची कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त केली होती. मनी लॉंड्रिंगप्रकरणी ईडीने ही कारवाई केली होती.
यानंतर ईडीने शुक्रवारी पुन्हा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना लक्ष केले. नागपूर जिल्ह्यात असलेल्या नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेजवर ईडीने छापा टाकला. सकाळी ११ वाजता ईडीचे अधिकारी कारवाईसाठी येथे पोहोचले. सकाळपासून सुरू असलेली कारवाई दुपार झाल्यावरही सुरूच होती. अद्याप कारवाई सुरू असल्याने अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखीन वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.