hybrid solar eclipse 
नागपूर

Hybrid Solar Eclipse : शंभर वर्षानंतर जुळून आला योग, गुरुवारी दिसणार ‘हायब्रिड सूर्यग्रहण'

खगोप्रेमींसाठी पर्वणी : एकाच दिवशी ग्रहणाचे ३ प्रकार दिसणार

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : वर्षांतील पहिले सूर्यग्रहण गुरुवारी २० एप्रिल रोजी होणार आहे. तब्बल १०० वर्षांनी दिसणारे हे हायब्रिड सूर्यग्रहण’ असेल. कारण एकाच दिवशी या सूर्यग्रहणाचे ३ प्रकार दिसणार आहेत. मात्र हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही.

या हायब्रिड सूर्यग्रहणाला निंगालू किंवा शंकर सूर्यग्रहण असेही म्हटले जाते. हायब्रिड म्हणजे आंशिक (खंडग्रास), संपूर्ण (खग्रास) आणि कंकणाकृती अशा तीन स्वरुपात हे सूर्यग्रहण दिसेल. हे ग्रहण सकाळी ७.४५ वाजता सुरू होऊन दुपारी १२.२९ वाजता सुटेल. हे ग्रहण आशियातल्या काही देशांसह ऑस्ट्रेलिया, हिंदी महासागर आणि अंटार्क्टिका येथून दिसेल.

ते भारतात दिसणार नाही. यंदा वर्षभरात ४ ग्रहणे दिसणार आहेत. सूर्यग्रहण तीन रुपात दिसणार आहे, म्हणजेच पूर्ण, कुंडलीकार व आंशिक रुपात ग्रहण दिसून येऊ शकते. हा योग तब्बल १०० वर्षांनी जुळून आलेला आहे, असे स्काय वॉच ग्रुपचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी कळविले आहे.

अंधश्रद्धा बाळगू नये

ग्रहणे ही खर तर सावल्यांचा खेळ आहे. परंतु प्राचीन भारतात आणि जगातील काही देशात ज्योतिष्य अभ्यासक मात्र राशी, नक्षत्र आणि ग्राहनांचा प्रभाव मानवावर पडतो असे मानतात. अजून तरी हा परिणाम कसा होतो हे ते सिद्ध करू शकले नाहीत.

दररोज होणारी रात्र हा पण एकप्रकारे ग्रहनाचाच प्रकार असतो. ग्रहणात तर केवळ थोडेच मिनिटे अंधार पडतो,पशू-पक्षांना ग्रह, राशी-भविष्याचा जर काही फरक पडत नाही तर केवळ माणसांनाच का ? कारण हे सर्व आपण निर्माण केलेले तर्क-वितर्क आहेत. जो पर्यंत विज्ञानाच्या आधारे आपण सिद्ध करू शकत नाही तो पर्यंत तरी ह्या अंधश्रद्धाच आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT