नागपूर : माहेरी राहणाऱ्या पत्नीचे कुण्यातरी युवकाशी अनैतिक संबंध आहेत, असे संशयाचे भूत पतीच्या मानगुटीवर बसले. त्यातूनच त्याने पत्नीच्या गळ्यावर वार करून ठार मारण्याचा (Attack on wife) प्रयत्न केला. याप्रकरणी इमामवाडा पोलिसांनी हल्लेखोर पतीला अटक करून तीन दिवस पोलिस कोठडी (Husband to police custody) घेतली. रिया (वय २०) असे जखमीचे तर निखिल प्रताप दमके (वय २१) असे अटकेतील हल्लेखोर पतीचे नाव आहे. (Attack-on-wife-over-suspicion-of-character)
एका वर्षापूर्वी दोघांनी पळून जाऊन मंदिरात लग्न केले. गेल्या काही महिन्यांपासून रिया सतत व्हॉट्सॲप व फेसबुक बघायची. त्यामुळे निखिल तिच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. यावरून दोघांमध्ये वाद व्हायचे. काही महिन्यांपूर्वी रिया उंटखाना येथे भाड्याने राहायला आली. मंगळवारी दुपारी निखिल रियाच्या घरी आला. त्याने तिच्यासोबत वाद घालून चाकूने गळा चिरल व फरार झाला. याप्रकरणी इमामवाडा पोलिसांनी प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करून मंगळवारी रात्री निखिलला अटक केली. बुधवारी त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची पोलिस कोठडीत रवानगी केली.
पत्नीने घेतला गळफास; पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा
महिलेच्या आत्महत्यप्रकरणी सक्करदरा पोलिसांनी महिलेच्या पतीसह चौघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. नसरीन मोहम्मद इरफान (वय ३२) असे मृताचे तर मोहम्मद इरफान अब्दुल जब्बार (वय ३३), अब्दुल आरिफ शाहरुख अब्दुल जब्बार, मोहम्मद अजहर अब्दुल जब्बार, तनवीर अंजुम अब्दुल जब्बार अशी गुन्हा दखल केलेल्यांची नावे आहेत. लग्नानंतर इरफान व त्याचे नातेवाइक नसरीनचा शारीरिक व मानसिक छळ करायचे. त्यांच्या छळाला कंटाळून मे महिन्यात नसरीनने पंख्याला दुपट्टा बांधून गळफास घेतला. याप्रकरणी सक्करदरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. तपासानंतर पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
(Attack-on-wife-over-suspicion-of-character)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.