Nagpur Crime News sakal
नागपूर

Nagpur Crime News : भूखंडावर कब्जा करण्याच्या वादात युवकावर हल्ला

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : भूखंडाच्या वादातून रॉडने प्रहार करून युवकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही घटना गिट्टीखदान पोलिस हद्दीत घडली. आलोकसिंह राठोड (२३) रा. आकांशी ले-आउट असे जखमीचे नाव आहे. जखमी युवकाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मंगलसिंह राठोड (४७) यांचे आकांशी लेआउट, दाभा येथे भूखंड आहे. या भूखंडावरून नातेवाईक प्रितमसिंह राठोड (४२), मिथिलेश राठोर (३४) दोन्ही रा. रामनगर, ममता चव्हाण (४४) आणि तुलसीदास चव्हाण (४६) दोन्ही रा. नरखेड यांच्या सोबत तीन वर्षांपासून वाद आहे. घटनेच्या वेळी आरोपी साथीदारांसह भूखंडावर अतिक्रमण करण्याच्या उद्देशाने आले.

त्यांनी मंगलसिंह यांची पत्नी, मुलगा व मुलगी यांच्यासोबत भांडण केले. मंगलसिंह यांनी समजविण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्यांना शिवीगाळ व मारहाण केली. तसेच त्यांच्या हाताला चावा घेतला.

मंगलसिंह यांच्या मुलाने मध्यस्थी केली असता आरोपींनी त्याच्या डोक्यावर रॉडने वार केला. जखमी अवस्थेत त्याला खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. या प्रकरणी मंगलसिंह यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून अटक केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT