व्यक्तीला होणाऱ्या एकुण आजारांपैकी ८० टक्के दूषित पाण्यामुळे होतात. उन्हाळ्यात पाणीटंचाई भासत असल्याने उपलब्ध होईल ते पाणी प्यावे लागते. या पाण्यातून आजार पसरविणारे विषाणू शरीरात जातात. रुग्ण, लहान मुले आणि स्त्रीयांना याचा जास्त त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी दुषित पाणी पोटात जाणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. आरोग्य सेवा आधुनिक झाल्या असल्या तरी तळागाळातील नागरिकांपर्यंत त्या पोहचल्या नाहीत. त्यातच पर्यावरणविषयक समस्यांची भर पडत आहे. जलप्रदुषण त्यापैकी एक. दरवर्षी सुमारे सुमारे अकरा लाख नागरिकांचे अकाली मृत्यू पर्यावरणविषयक जोखमीमुळे होतात. तसेच दुषित पाणी, अस्वच्छ परिसर यामुळे सार्वजनिक आरोग्यासमोरील धोके वाढले आहेत, असे आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. श्रीराम गोगुलवार यांनी सांगितले आहे.
पाण्यातील रसायनांमुळे…
कर्करोग, त्वचारोग, मानसिक आजारांचा धोका असतो. तसेच अमिबाजन्य आणि किटाणूंपासून आजारही होऊ शकतात.
दुषित पाण्याचे दुष्परिणाम
विषाणू : यकृतदाह, बालपक्षाघात (पोलिओ होण्याचा धोका)
जिवाणू : अतिसार, हगवण, हैजा, पटकी, विषमज्वर आदी आजारांचा धोका
कृमीं : गोलकृमी, तंतूकृमी, आकडाकृमी, चाबूककृमी, नारु विकारांचा धोका
नदी-नाले काठावरील वस्त्यांना धोका
एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्येच्या शहरांत एका दिवसात सुमारे १६६६२ दशलक्ष लिटर सांडपाणी निर्माण होते. नदी- नाल्याच्या काठावर वसलेली शहरे आणि गावे ३३ टक्के सांडपाणी तयार करतात. प्रदूषित पाण्याचा सर्वाधिक फटका नदी आणि नाल्यांच्या काठावर असलेल्या वस्त्यांना बसतो.
स्वच्छ हवा, सुरक्षित पाणी आणि स्वच्छ परिसर, सर्वांकरिता आरोग्यदायी अन्नाची उपलब्धता, राहण्यायोग्य शहरे, आर्थिक सबलीकरण आणि आरोग्यमय कल्याणकारी बाबींवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे. हवेचे प्रदुषण टाळण्यासाठी अधिकाधिक वृक्ष लागवड करावी. अधिक ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षांची लागवड करावी.
- डॉ. श्रीराम गोगुलवार, प्राचार्य, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण, नागपूर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.