नागपूर

Awareness : पर्यावरणाच्या रक्षणासाठी सुरभीने राबविले जनजागृती अभियान

नीलेश डाखोरे

नागपूर : पर्यावरणाच्या रक्षणासाठी (Environmental protection) अनेक प्रकारचे प्रकल्प सुचवले जातात. कोणीतरी आपल्या गच्चीवर बाग करतो. मात्र, वृक्षांची लागवड व जोपासना करणे हे सर्वांचे कर्तव्य (It is everyone's duty to plant and nurture trees) आहे. मला पृथ्वी वाचवायची आहे, स्वतःला वाचवायचे आहे, मला रोगांपासून मुक्‍ती हवी आहे असे ठरवून प्रत्येकाने काही ना काही योजना राबवणे गरजेचे आहे. हेच ठरवून सुरभी जयस्वाल दहा वर्षांपासून पर्यावरणाच्या रक्षणासाठी जनजागृती अभियान (Awareness campaign for protection of environment for ten years) राबवीत आहे. (Awareness-campaign-launched-by-Surabhi-jaiswal-of-Nagpur-for-protection-of-environment)

पर्यावरण संरक्षण हा जागतिक पातळीवरचा मोठा विषय आहे. या करारावर जगातील १४९ देशांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. कार्बनचे उत्सर्जन कमी करून पृथ्वीवरील ग्रीन कव्हर वाढविणे हे आद्य कर्तव्य जोपासणे गरजेचे आहे. यासाठी दैनंदिन जीवनातील लहान-लहान सवयी बदलल्या तर पर्यावरणास मोठा हातभार लागू शकतो. पाण्याचा काटकसरीने वापर करणे तसेच नद्या व तलावातील प्रदूषण थांबविणे पर्यावरणासाठी हितकारक ठरते.

हरित वनसृष्टी जोपासण्यासाठी वस्तूंचे रिसायकलिंग व्हायला हवे. घातक रासायनिक खतांचा वापर न करता घरच्या घरी परसबागेत भाज्या पिकविणे व नैसर्गिक जीवन पद्धतीचा अंगीकार करावा. प्रत्येकाने हा वसा उचलल्यास पर्यावरणास हातभार लागून काही प्रमाणात का होईना पर्यावरणाची हानी टाळता येईल. यासाठी प्रत्येक जबाबदार नागरिक व विद्यार्थ्यांनी सहभाग घेण्याचे आवाहन ग्रीन व्हिजीलच्या टीमची लिडर सुरभी जयस्वाल हिने केले आहे.

दहा वर्षांपासून पर्यावरणाचा ध्यास घेतलेल्या सुरभी हिने पर्यावरणाबाबत प्रत्यक्ष कार्य करीत चारशेंच्यावर जनजागृती अभियान राबविले आहे. पर्यावरणाबाबत अभियान राबविणाऱ्या शहरातील सर्वाधिक तरुण महिला असून, या क्षेत्रात अनेक पुरस्कार मिळाले आहेत. पर्यावरणाचे रक्षण केले तरच पर्यावरण तुमचे रक्षण करेल, असे सुरभी जयस्वाल हिने सांगितले.

नागपूर महानगरपालिकेतर्फे सत्कार

सुरभी जयस्वाल हिने पर्यावरण विज्ञान विषयात प्रथम क्रमांक मिळविला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने घेतलेल्या एमएससी परीक्षेत सुरभी हिने पर्यावरण विज्ञान विषयात ८० टक्के गुण मिळवले होते. नागपूर महानगरपालिकेने सुरभीच्या पर्यावरण संवर्धनात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सत्कार केला होता. पर्यावरण संरक्षण आणि इतर संबंधित बाबींवर जागरूकता निर्माण करण्यासाठी ती कार्य करीत असते. गणेशोत्सव काळात फुटाळा तलावावर जलप्रदूषण रोखण्यासाठी तिने व पथकाने विशेष मोहीम हाती घेतली होती.

पर्यावरण आणि ग्लोबल वॉर्निंग हा विषय पुस्तकात आणि बातमीपुरता मर्यादित ठेवणे म्हणजे जीवसृष्टीच्या नष्टतेकडे होणारी वाटचाल आहे. तो केवळ त्या पुरता मर्यादित न राहता प्रत्येक नागरिकाने स्वत:च्या जीवनाचा अविभाज्य घटक बनवावा, तरच पुढच्या पिढीला आपण शुद्ध हवा-पाणी देऊ शकू.
- सुरभी जयस्वाल, टीम लिडर, ग्रीन व्हिजील

(Awareness-campaign-launched-by-Surabhi-jaiswal-of-Nagpur-for-protection-of-environment)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT