ज्याने आपल्या आतला रावण काढला तो राम झाला SAkal
नागपूर

Ayodhya Ram Mandir : मन राम रंगी रंगले : ज्याने आपल्या आतला रावण काढला तो राम झाला

सकाळ वृत्तसेवा

सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया।

सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्।।

‘सर्व सुखी व्हावे, सर्व रोगमुक्त व्हावेत, उत्तमाचे सर्व साक्षीदार व्हावेत आणि कुणीही दुःखाचा भागीदार होऊ नये’, ही रामराज्याची कल्पना आहे. महात्मा गांधी यांनासुद्धा हेच राज्य अपेक्षित होते.

राजा संन्याशी वृत्तीने चालला पाहिजे, अशा प्रकारचे राज्य करण्याचा आदर्श रामाने केला. रामाने आपल्यातील रावण बाहेर काढला. अर्थात त्यांनी आपल्यातील अहंकार बाहेर काढला.

त्याला तिलांजली दिली. आपणही आपल्यातील रावण अर्थात मी, अहम, स्वार्थ, सत्तालोलुप वृत्ती यांना तिलांजली दिली तर तुम्ही राम म्हणून पुढे याल. प्रत्येकाने आपल्यातील दुर्गुण बाहेर काढले पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने रामराज्याची कल्पना साकार होईल.

  • आदर्श राज्याचे जेव्हा आपण उदाहरण देतो तेव्हा राजा रामाचा आदर्श आपल्यासमोर आजही येतो. म्हणजे त्यावेळी किती पद्धतशीरपणे रामाने राज्य केले याची प्रचिती येते. रामाची तिची पद्धत अंगीकारली पाहिजे.

  • आजचे राजकारण पाहिले तर राजकारण्यांची कीव करावीशी वाटते. खऱ्या अर्थाने रामराज्याची कल्पना साकारायची असेल तर तुम्हाला स्वतःतील रावण काढावा लागेल.

  • ज्या व्यक्तीत मानवतेचे आदर्श आहे तो खऱ्या अर्थाने देव आहे. माणसातला रावण काढता आला पाहिजे. मनुष्यरूपात येऊन रामाने स्वतःतील रावण काढला.

रावण म्हणजे अहंकार. जोपर्यंत तो जात नाही तोपर्यंत रामाची कल्पना करवत नाही. प्रत्येकाने आपल्यातील दुर्गुणांना बाहेर काढले तर आपोआप त्यांना रामाचे दर्शन होईल. सर्वांचे कल्याण व्हावे, ही वृत्ती अंगीकारली पाहिजे.

प्रत्येकाचा आदर करण्याची व्यवस्था म्हणजे खऱ्या अर्थाने सत्याची व्यवस्था म्हणावी लागेल. मानवातला आदर्श म्हणजे देव. रामाने मानवाचा जन्म घेऊन रामराज्य निर्माण केले. आज खऱ्या अर्थाने त्या रामराज्याची गरज आहे.

- डॉ. शरद निंबाळकर, माजी कुलगुरू, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, संत साहित्याचे अभ्यासक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi: विदर्भ बदलतो संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण, ढासळलेला बालेकिल्ला नरेंद्र मोदी मजबूत करणार? वर्धा दौरा का आहे स्पेशल?

Crime: तक्रार केलीस तर... धमकी देत १३ वर्षीय मुलावर अत्याचार, ५० वर्षीय नराधमाचं कृत्य, मुलुंडमध्ये खळबळ

Latest Marathi News Updates : शरद पवार यांनी मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी पक्षाच्या नेत्यांची बैठक घेतली

Shama Sikander : बालवीर फेम शमा सिकंदरने केला होता आयुष्य संपवण्याचा प्रयत्न ; खुलासा करत म्हणाली "हॉस्पिटलमध्ये मला दाखल..."

Share Market At Record High: शेअर बाजाराने केला नवा विक्रम, सेन्सेक्स पहिल्यांदाच 84 हजारांवर पोहोचला

SCROLL FOR NEXT