bail pola  sakal
नागपूर

Bail Pola : झडत्यांचा समृद्ध वारसा टिकणार की नामशेष होणार?

पोळ्याला आज खड्या आवाजात गायली जाणार लोकगीते

शरद सहारे

वेलतूर - काळाच्या ओघात सर्वकाही गुडूप होत असते. जगात कधीकाळी समृद्ध असलेल्या संस्कृती कालविवरात सामावल्याचा इतिहास आपल्या समोर आहे. मात्र, भारतात आज तरी सिंधू संस्कृती आणि तिचे अवशेष सण,उत्सवांच्या रूपाने कायम आहेत. कृषी संस्कृती त्याचाच एक भाग.

कोट्यवधी नागरिकांच्या पोटात दोन घास जावेत, यासाठी राबणाऱ्या शेतकऱ्यांचा महत्त्वाचा सण म्हणजे पोळा. पोळ्याच्या दिवशी बैलाला नवरदेव मानत त्याची पूजा केली जाते. बैल तोरणाखाली आल्यानंतर सुरू होतो खड्या आवाजातील झडत्या. पण, जसा जसा काळ पुढे सरकत आहे तशा तशा झडत्या म्हणणाऱ्यांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे हा समृद्ध वारसा टिकणार की नामशेष होणार हे येणारा काळच ठरवेल.

बैलाला सजविल्यानंतर सायंकाळी गावाच्या मध्यभागी उभारलेल्या तोरणाखाली शेतकरी बैल उभे करतात. पोळ्याच्या दिवशी बैल म्हणजे देवाचे रुप असते. शंकराचे वाहन म्हणजे नंदी. नंदी अर्थात बैलाची पूजा करीत त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. नंतर सुरू होते खड्या आवाजातील झडत्यांचे गायन.

‘‘एक नमनगौरा पार्बती हरहर महादेव…..!’’ ज्या जयघोषाने एकाहून एक सरस झडत्या सुरू होतात.

त्यापैकी काही संकलित झडत्या खास दै.‘सकाळ’च्या वाचकांसाठी.

वाडा रे वाडा, शेतकऱ्याचा वाडा

शेतकऱ्याच्या वाड्यात

चांदीचा गाडा चांदीच्या गाड्यावर

सोन्याचे मोर मोरावर बसते

शेतकऱ्याचं पोर

एक नमन‌ गौरा पार्वती हर हर महादेवऽऽऽ

चाकचाडा बैलगाडा,

बैल गेला पवनगडा

पवनगडाहून आणली माती

थे दिली गुरूच्या हाती

गुरूने बनविली चकती

दे माझ्या बैलाचा झाडा

मग जा आपल्या घराऽऽऽ

एक नमनगौरा पार्बती हरहर महादेव…..!

आभाळ गडगडे, शिंग फडफडे

शिंगात पडले खडे तुझी माय काढे

तेलातले वडे तुझा बाप खाये पेढे

एक नमनगौरा पार्बती हरहर महादेव…..!

गणा रे गणा, गण गेले वरच्या राणा

वरच्या राणातून आणली माती

ते देल्ली गुरूच्या हाती

गुरूनं घडविला महानंदी

ते नेला हो पोळ्यामंदी,

एक नमन गौरा पारबती

हरऽऽ बोला हरऽऽ हर ऽऽ महादेव

बळी रे बळी लिंब बनी

अशी कथा सांगेल कोणी

राम-लक्ष्मण गेले हो वनी

राम-लक्ष्मणाने आणली वनफुले

ते दिले महादेव पारबतीच्या हाती

तीनशे साठ नंदी

एक नमन गौरा.. महादेव..!

वाटी रे वाटी खोबऱ्याची वाटी,

शेतकरी लढे जन्मंभर

रास्त भावासाठी

एक नमन गौरा.. महादेव..!

चकचाडा बैलबाडा

बैल गेला हो पहुनगडा,

पहुनगड्याची आनली माती

ती दिली हो गुरुच्या हाती

गुरु न घडविला हो नंदी,

साजून भाजून भर सभेत उभा केला

पुढून दिसते हिरवा पिवळा

मागून दिसते हो नितनवरा,

चक्करशोभ्या मंधी

बैल तोरणामंधी

द्याहो आमच्या चौऱ्यामटाट्याचा झाडा

मग जा आपल्या घरा

एक नमन गौरा .....

पोळा रे पोळा पाऊस झाला भोळा

शेतकरी हितासाठी सगळे व्हा गोळा.

एक नमन गौरा .....

वाटी रे वाटी खोबऱ्याची वाटी,

महादेव रडे दोन पैशासाठी,

पार्बतीच्या लुगड्याले छप्पन गाठी,

देव कवा धावल गरिबांसाठी,

एक नमन गौरा पर्बती हरबोला हर हर महादेव....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT