नागपूर : "कोरोना'च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर देशात 21 दिवसांचा लॉकडाउन सुरू आहे. नागरिकांना घराबाहेर निघण्यास मनाई करण्यात आली आहे. अत्यावश्यक काम असल्यास पास घेऊन बाहेर निघावे लागत आहे. विनाकारण बाहेर फिरताना आढळल्यास पोलिसांच्या तंडुकाचा सामना करावा लागतो. इतक्या मोठ्या प्रमाणात लॉकडाऊन असताना शहरातील या पठ्ठ्याने चक्क हा प्रकार करण्याची हिंमत दाखवली...
शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे बॅंक उघडली. अत्यावश्यक कामासाठी बॅंकेचे व्यवहार सुरू आहे. असे असताना अभियांत्रिकीचा विद्यार्थी करण (18, रा. वैशालीनगर) हा बॅंकेत आला. त्याच्याजवळ काळ्या रंगाची बॅग होती. बॅग घेऊन काही ग्राहकांसोबत तो आत शिरला. कोरोना व्हायरच्या भीतीमुळे सर्वांच्या तोंडावर मास्क बांधले होते. आपल्याला कोरोनाची लागण होऊ नये म्हणूण सर्वजण काळजी घेत होते.
करणही तोंडावर कापड बांधून आला होता. संधी मिळताच त्याने धारदार शस्त्र काढून सफाई कर्मचारी तुषार बावनगडे याच्या गळ्याला लावला. अचानक घडलेल्या या प्रकाराने बॅंकेत एकच खळबळ उडाली. काहीही समजण्याच्या आत करणने तुषारला ठार मारण्याची धमकी देऊन सर्वांना जागीच उभे राहण्याचे आणि मोबाईल बाहेर न काढण्याचे फर्मान सोडले.
यानंतर तुषारला ओढत बॅंकेच्या अधिकारी सरिता जांभूळकर यांच्या कक्षाजवळ घेऊन गेला. काउंटरवरील सर्व रक्कम बॅगमध्ये टाकण्याचा दम दिला. जिवाच्या भीतीने त्यांनी जवळील एक लाख चार हजार 660 रुपये आरोपीच्या बॅगेत टाकले. त्यानंतर सहा नंबर कक्षाकडे जात सहायक अधिकारी नीलेश किनकर यांनाही धमकावले.
असे का घडले? - कर्फ्यूमुळे मिळाली नाही दारू... म्हणून अशी भागवली तलफ.. मग
त्यांनीही काउंटरमधील नऊ हजार तीनशे रुपये आरोपीच्या बॅगेत टाकले. एकूण एक लाख 13 हजार 960 रुपये लुटून आरोपीने पळ काढला. त्याचवेळी बॅंकेतील अधिकाऱ्यांनी आरडाओरड केल्याने परिसरात गस्त घालणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांनी सिनेस्टाइल पाठलाग करीत आरोपीला पकडले. हा थरारक घटनाक्रम शुक्रवारी दुपारच्या सुमारास एसबीआयच्या वैशालीनगर शाखेत घडला.
करणच्या परिवाराची स्थिती फारच हलाखीची आहे. त्यात कोरोना व्हायरसमुळे संचारबंदी असल्याने परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. यामुळेच त्याने हे पाऊल उचलल्याची चर्चा आहे. आरोपीला वडील नसून तो काका-काकूकडे राहून अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असल्याची माहिती आहे. या प्रकरणाबाबत विचारणा करूनही पाचपावली पोलिसांकडून टाळाटाळ करण्यात येत होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.